Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा – NNL

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा – NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासन जोमाने तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी सुटणार नाही,यासाठी तहसील कार्यालय, सर्व बँक अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच गावागावातील सुशिक्षित तरुणांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, तसेच सिईओ मिनल करनवाल यांनी केले आहे. राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ' अंतर्गत एकही पात्र लाभार्थी नांदेड जिल्ह्यात वंचित राहणार नाही. यासाठी आज जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. पुढील दोन दिवसात यासंदर्भातील मोबाईल ॲप सुरू होणार असून प्रत्येक लाभार्थ्याने किंवा लाभार्थ्याना मदत करणाऱ्या सुशिक्षित तरुणाईने, सेतू व सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक पात्र भगिनीचा अर्ज अपल...
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार -NNL

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार -NNL

Blog
मुंबई|‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास सचिव डॉ. अनुप कुमार यादव उपस्थित होते. तर दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण...
तालुक्यातील विनाशिक्षक असलेल्या 15 शाळांना आजपासून मिळणार शिक्षक – शिक्षणाधिकारी सविता बिरगे – NNL

तालुक्यातील विनाशिक्षक असलेल्या 15 शाळांना आजपासून मिळणार शिक्षक – शिक्षणाधिकारी सविता बिरगे – NNL

नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर तालुका हा आदिवासी बहुल भागातील तालुका म्हणून नांदेड जिल्ह्यात परिचित आहे. या तालुक्यातील पंधरा शाळेवर एकही शिक्षक कार्यरत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने वाऱ्यावर सोडले की काय..? असा प्रश्न तालुक्यातील सुजाण नागरिक विचारत आहेत. हिमायतनगर तालुक्याला आठ केंद्र व तीन बीट असल्यामुळे हिमायतनगर येथील शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील 110 शाळांचा कारभार चालविला जातो. त्यामुळे एक जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयास भेट देऊन शिक्षकांच्या पदभरती संदर्भात आढावा घेतला. तसेच येथील शिक्षकांच्या जागा तात्काळ भरून तालुक्यातील सर्व शाळांना शिक्षक देण्याचे आदेश दिले. हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी नैसर्गिक वर्ग खोल्या...
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये दोन पानाच्या दुर्मिळ ‘पळस’ वृक्षांचे लागवड – NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये दोन पानाच्या दुर्मिळ ‘पळस’ वृक्षांचे लागवड – NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना व उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ७ जुलै वन महोत्सवानिमित्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एम.के. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरामध्ये अत्यंत दुर्मिळ व औषधीसाठी उपयुक्त असणारे दोन पानांच्या ‘पळस’ चे वृक्षारोपण करण्यात आले. दोन पानांचे औषधी पळस रोप हे किनवट भागातुन किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवाशी विकास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्यामार्फत विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहाय्यक क...
विद्यार्थ्यांनी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता असलेल्या संस्थेतच प्रवेश घ्यावा – NNL

विद्यार्थ्यांनी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता असलेल्या संस्थेतच प्रवेश घ्यावा – NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2024-25 प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी ज्या संस्थेत द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता आहे, अशा संस्थांमध्ये प्रवेश घेण्यात यावा. ज्या संस्थेमध्ये या विभागाची मान्यता नाही. अशा संस्थेनी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिल्यास, त्यांचे प्रवेश नामंजूर करण्यात येतील अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. विद्यार्थी व पालकांनी मान्यताप्राप्त द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाची यादी व संस्था जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा सर्व संबंधितानी मान्यता यादी पाहून मान्यताप्राप्त संस्थेतच आपला, आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. सद्यस्थितीत चालू असले...
कृषी क्षेत्रातही उत्तम ‘करिअर’असल्याचा संदेश जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवा : सिईओ -NNL

कृषी क्षेत्रातही उत्तम ‘करिअर’असल्याचा संदेश जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवा : सिईओ -NNL

नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| आपली बुद्धिमत्ता वापरून कल्पकतेने शेती केली तर या व्यवसायातून उत्तम असे करिअर निर्माण होऊ शकते. ज्या उच्चशिक्षित लोकांनी शेतीमध्ये स्वतःला झोकून दिले ते नोकरदारांपेक्षा अधिक चांगले जीवन जगत आहेत. शेतीत उत्तम करिअर आहे . मात्र या यशकथा जनतेपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज येथे व्यक्त केली. नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. आज कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषीनिष्ठ शेतकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना त...
नेत्यांच निवडणूका लागतात…तर कार्यकर्त्यांच्या निवडणूकीला इतका उशीर का…? कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल -NNL

नेत्यांच निवडणूका लागतात…तर कार्यकर्त्यांच्या निवडणूकीला इतका उशीर का…? कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका झाल्या असुन, आता विधानसभेचे पडघम हदगाव विधानसभा क्षेञांत वाजु लागले आहे. स्थानिक बडे नेत्याकडे लाभाच्या पदासह अनेक पदे आहेत. ते बडे नेते विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागा म्हणुन गोड बोलुन खाद्यावर हात ठेवून कार्यकर्त्यांच्या छोटासा जरी कार्यक्रम आसला तरी हजेरी लावतांना दिसुन येत आहेत. विशेष म्हणजे स्थानिय नेते मंडळी व इच्छुकांना विधानसभेच्या निवडणूकीच वेध लागले असतांना माञ त्याना कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचे 'सोयरसुतक' नाही का..? अश्या संतप्त प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्ते याच्या मध्ये ऐकवायास मिळत आहे. वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक संपताच जिल्हा परिषद, पचायत समिती, नगरपालिका ह्याच्या निवडणूका अपेक्षित होत्या. कारण या निवडणूकातुन कार्यकर्ते याना 'एनर्जी 'मिळत असते. मिनी मञालय 'म्हणून ओळखल्या जाणा-या ह्या जि. प. प.स.स्थानिक स्वराज्य सस्थ...
मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

नांदेड
नांदेड| मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे घातल्यानंतर नांदेड परिसरात दिवसभर पाऊस पडला असून २३ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां टाकण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये आवाहन केल्यानुसार यात्रेकरूंनी स्वतःच्या आईच्या नावाने एकेक झाड लावले. अमरनाथ यात्री संघ,भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश...
दोन हजार झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम ६ जुलै रोजी -NNL

दोन हजार झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम ६ जुलै रोजी -NNL

नांदेड
नांदेड| येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ६ जुलै २०२३ रोजी दोन हजार झाडांच्या वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याच अनुषंगाने रक्तदान व आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी मिशनचे दिपक कदम हे राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटक रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा सोनाळे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील नेते बापुराव गजभारे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला भदंत पंय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघ, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पी...
नंदगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांची जयंती जल्लोषात साजरी -NNL

नंदगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांची जयंती जल्लोषात साजरी -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील नंदगाव येथील जि. प. प्राथमिक हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शा.व्य.समिती अध्यक्ष गिरधारी पवार यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच देविदास मोहन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ सातपुते, सदस्य लखन आडे, विजय आडे उपस्थित होते. मुख्याध्यापक नलाबले यांनी सर्वांचे स्वागत केले. तद्नंतर शाळेतील शिक्षक विजय काळे यांनी जयंतीनिमित्त प्रास्तविकपर विचार मांडले. या प्रसंगी गीतांजली चव्हाण, रिंकू आडे, अशिका जाधव, संजीवनी चव्हाण, सोनू जाधव, रोशनी पवार, श्रावणी पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थीत मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु. अ. लक्ष्मण नलाबाले, स.शि.प्रविण अंबालकर, स. शि. विजय काळे, व स.शि. कु. रोहिणी घुमे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील पुर...
error: Content is protected !!