Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन 2023 व सन 2024 या वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींची नावे पाठविण्यात येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराकरिता नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र कलाकारांच्या नावांची शिफारस (वैयक्तिक माहितीसह) 13 सप्टेंबर 1993 च्या शासन निर्णयात जोडलेल्या तपशीलाप्रमाणे mahaculture@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठवावे. आलेल्या शिफारशी समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक का...
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

नांदेड
नांदेड| ७ जुलै रोजी सायंकाळी डॉ.अण्णा भाऊ साठे चौक येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडेरेशन मंडळ कार्यालयात समाजातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पुढाऱ्यांची बैठक जेष्ठ नेते सतीश कावडे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. या बैठकीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक नांदेड जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी घेण्यात आलेल्या या बैठकीस विविध राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक ऑगस्ट रोजी सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने नांदेड शहरात आणि जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतीक कार्यक्रम राबविण्यात येत असतात व जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने पुढील एक वर्षाचे...
आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL

आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| आगामी काळात विधानसभेची लगीनघाई लक्षात घेऊन निवडणूक कधी लागेल याचा नेम नसल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट तालुक्यात भेटीगाठीवर जोर दिला. व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करत लोकसभा निवडणुकी दरम्यान रात्रंदिवस एक करत महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना किनवट माहूर मतदार संघातून अधिक मताची बेरीज जुळवत अधिक मताने लीड देऊन निवडून आणले,अशा या किनवट माहूर मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर शिवनी, कुपटी कोसमेट, कोल्हारी भिसी, पांगरी या गावांना भेटी देऊन मतदारांची संवाद साधत असता मोठ्या प्रमाणात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माजी आमदार प्रदीप नाईक हे शिवणी येथे आले असता एक संयमी आणि विकासभिमुख नेता म्हणून त्यांच्याकडे ...
अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर /ढाणकी। अर्धापूर - माहूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय या नावाने अस्तित्वात आला हा मार्ग अर्धापूर - तामसा - आष्टी - जवळगाव - हरदडा - ढाणकी - फुलसावंगी पर्यंतच काम झाले. या मार्गाचे दोन वेगवेगळ्या निविदा निघाल्या एक अर्धापूर हिमायतनगर तर दुसरी हिमायतनगर फुलसावंगी या निविदा दैनिक गावकरी ह्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम मात्र अर्धापूर - घारापुर - बोरी - हरदडा - ढाणकी फुलसांवगी असे करण्यात आले आहे. गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला असल्याचे दिसून येत असून, मंजूर निविदेत दाखविलेला मार्ग अन्य ठिकणाहून कसा काय केला... याचं गौड बंगाल काय..? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. मंजूर रस्त्याचे अपवाद फक्त मेट ते निगंनुर पाझर तलावापर्यंत डांबरी काम का झाले ? व कसे? हे देवालाच माहित. हा रस्ता क्रमांक 752 आय गुगल वर...
भदंत पंयाबोधी शांततेचे अग्रदूत – श्रीकृष्ण कोकाटे -NNL

भदंत पंयाबोधी शांततेचे अग्रदूत – श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड
नांदेड| शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसह धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो यांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. अनेक वेळा शांतता कमिटीचे सदस्य या नात्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. बुद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार करतांना आजच्या काळातील ते शांततेचे अग्रदूत बनले आहेत, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. यावेळी भदंत पंयाबोधी थेरो व भिक्खू संघासह आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे, रमेशदादा सोनाळे, बापुराव गजभारे, देवराव खंदारे, डॉ. गंगाधर सोनकांबळे, प्रफुल्ल सावंत, प्रभू सावंत, इंजि. भरतकुमार कानिंदे, गोविंद दळवी, इंजि. प्रशांत इंगोले, विनायक गजभारे, कैलास सावते, सुभाष रायबोले, संदिप सोनकांबळे, विठल गायकवाड, उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, एस. एन. गोडबोले आदींची उपस्थि...
अमरनाथ गुहेतून भाग- ३ ; लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

अमरनाथ गुहेतून भाग- ३ ; लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
आजचा संपूर्ण दिवस हा रेल्वेतच जाणार असल्यामुळे निवांत उठण्याचे ठरवले होते. पण दररोजची सवय असल्यामुळे सकाळी पाचच्या आधीच जाग आली. प्रात्यविधी आटोपला. पंधरा ते वीस मिनिटात प्राणायाम केला. तरीदेखील वेळ जात नव्हता. हमसफर एक्सप्रेसच्या बी १३ या शेवटच्या डब्यामध्ये माझा बर्थ होता. बी १ पर्यंत प्रत्येक डब्यात आमचे काही सहप्रवासी होते. बी १ च्यानंतर पेंट्री कार चा डब्बा होता. घड्याळात पाहिले तर साडेपाच वाजले होते. मग मी निर्णय घेतला की, पेंट्री कार मध्ये जाऊन सर्वांसाठी नाष्टा व चहाची ऑर्डर द्यायची. रेल्वेतच मॉर्निंग वॉक सुरू झाला. काही डब्यामध्ये आरएसी असलेले प्रवासी खाली झोपलेले आढळले. त्यांना ओलांडून जात असताना मॉर्निंग वॉक मध्ये अडथळ्याची शर्यत पूर्ण करत असल्यासारखे वाटले. सर्वजण निवांत झोपले होते. अर्धा तास चालत गेल्यानंतर शेवटी पेंट्री कार चा डब्बा आला. तिथे मात्र सर्व कर्मचारी आपापली काम...
मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL

मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| एसटी बसेस व अन्य सवलती मिळाव्यात म्हणून काही महीलांनी आपले वय कमी असतांना ही मतदार ओळख पञ आधारकार्डवर वाढवून घेतले. याचा फायदा बस प्रवासाकरिता व शासनाच्या अन्य योजेनेला झाला तरी माञ हदगाव तालुक्यातील बहुसंख्य महीला माञ मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेपासुन वचिंत राहणार असल्याचे चिञ दिसुन येत आहे. वय वाढवून घेणा-या महीलाना आता माञ पश्चात्ताप होत असल्याच दिसून येत आहे. तर काही महीला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत माञ फार्म भरतांना दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने 21ते 65वर्ष वयोगटातील 'लाडकी बहीण 'या योजेनेतून बस प्रवासा करिता वाढवून घेणाऱ्या महीला या योजनेपासुन अपाञ ठरणार आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन असुन, शेवटचे अधिवेशन असल्याने लोकप्रियता मिळविण्यासाठी अश्या घोषणा होत आहेत असे विरोधी पक्षाच्या लोकांकडून ब...
मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

नांदेड, लेख
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड, धाराशिव ,लातूर तसेच नांदेड, हिंगोली व परभणी या आठही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल ३१ कोटींची वीज चोरी उघडकीस आली आहे. मागील आर्थिक वर्षातील एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महावितरणने ही वीज चोरी उघडकीस आणली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील संभाजीनगर शहरात सर्वाधिक ग्राहक हे चोरून वीज वापरणारे निघाले. तसे पहिले तर संपूर्ण मराठवाड्यातच वीजचोर मुजोर झाले आहेत. महावितरण ने २८ कोटी ७९ लाख रुपये दंडाची रक्कम या वीज चोरट्यांकडून वसूल देखील केली आहे. एकीकडे नियमित वीज बिल भरणारे ग्राहक मुकाट्याने दरवाढ सहन करतात व विजेची बिले नियमित भरत असतात. परंतु त्याउलट मोफत व चोरून वीज वापरणारे आजही तेवढ्याच दिमाखात व फुकटात वीज चोरीचा फायदा लाटत आहेत. अशा वीज चोरट्यांवर कुठे ना कुठे...
अखेर तब्बल नऊ दिवसा नंतर तुरळक प्रमाणात काही भागात पिण्याचे पाणी नळाला -NNL

अखेर तब्बल नऊ दिवसा नंतर तुरळक प्रमाणात काही भागात पिण्याचे पाणी नळाला -NNL

नांदेड
नवीन नांदेड। सिडको हडको परिसराला पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात येणारी मुख्य लाईन गेल्या आठ दिवसापूर्वी रस्ता खोदताना फुटल्याने सिडको हडको परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला अखेर पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना ताटकळत रहावे लागले अखेर आठव्या दिवशी लोकप्रतिनिधी यांनी या बाबत केलेल्या तक्रारी दखल टॅकर व्दारे काही भागात तर नऊ दिवसानंतर काही भागात तुरळक प्रमाणात पाणी पुरवठा झाला आहे, पाणी पुरवठा विभागातील दोन अधिकारी यांच्यी बदली झाल्याने नव्याने आलेले अधिकारी हे पाणी पुरवठा विभागाकडे आली नसल्याने व माहिती नसल्याने नागरीकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत रहावे लागले आहे. विष्णुपूरी जलाशयातून नांदेड वाघाळा महागरपालीका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सिडको हडको हडको परिसरात करण्यात येणारी पिण्याच्या पाईप लाईन रस्ता खोदत असल्याने फुटल्या गेल्याने तब्बल आठ दिवसापासून परिसरात...
जि.प.शाळा उखळवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांची दांडी शाळेच्या वेळेत शाळेला बंद कुलूप -NNL

जि.प.शाळा उखळवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांची दांडी शाळेच्या वेळेत शाळेला बंद कुलूप -NNL

नांदेड, व्हिडीओ
वाळकेवाडी/हिमायतनगर, शंकर बरडे| हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायत दुधड-वाळकेवाडी अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथील शिक्षक दांडी मारत असल्याचा प्रकार शनिवार दि ५ जुलै रोजी समोर आला आहे. शाळेचा दिवस असून सुद्धा शाळेला कुलूप दिसले विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत होती पण शाळेच्या शिक्षकांला मात्र आपले घर सुटत नव्हते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत कधी वेळेवर उपस्थित राहतात तर कधी उखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याने खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिनांक ५ जुलै रोजी उखळवाडी येथील ग्रामस्थ व गावकऱ्यांना हा प्रकार लक्ष्य येताच त्यांनी हा प्रकार नागरिकांसमोर उघड केला आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी भेट देऊन शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शिक्षणाची हेळसांड थांबवा असे निर्द...
error: Content is protected !!