Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
youth died after touching an electric wire । शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन 22 वर्षे तरुणाचा मृत्यू -NNL

youth died after touching an electric wire । शेतात विद्युत तारेला स्पर्श होऊन 22 वर्षे तरुणाचा मृत्यू -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। शेतातील पोल वाकून लोंबकाळलेल्या विद्यूत वाहक तारांचा स्पर्श र्होऊन पार्डी खुर्द येथिल संभाजी कांदे (वय वर्ष ६६) आजोबा जखमी तर बोधडी खुर्द येथिल नातू पवन रामेश्वर मुंडे (वय वर्ष २२) या तरुणाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटना १२ जुलै रोजी पेन्दा गावच्या शिवारात घडली. या संतापजनक आणि र्‍हदयाचे ठोके वाढवणार्‍या घटनेला जबाबदार असणार्‍या लाईनमनसह संबंधितांवर कर्तव्यकसूरतेसह चक्क मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी संतप्त नागरीकांची मागणी आहे. या घटनेपेक्षाही अनेकांचा जीव घेणारी घटना प्रधानसांगवी गावातील मुख्य चौकात घडण्याची भिती गावकर्‍यांनी व्यक्त केली. लोकवर्दळ असलेल्या चौकातील एक पोल बुडातून तुटलेला तर दुसरा पूर्ण वाकलेला असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. असे असतांना देखिल महावितरण कम्पनी प्रशासन लापरवाह करीत असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी क...
Camp in every village | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात कॅम्प लागणार – NNL

Camp in every village | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात कॅम्प लागणार – NNL

नांदेड
नांदेड| राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. ग्रामस्तरीय समितीला प्रत्येक गावांमध्ये कॅम्प ( शिबीर ) घेण्याचे सूचित केले आहे. तसेच ठीक ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व त्यांची पूर्ण चमू तसेच नांदेड महानगरासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा घेत असून ठिकठिकाणी भेटी देत आहे. राज्य शासनाने नव्या शासन आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीने गाव पातळीवर शिबिर आयोजित करून अर्ज भरण्याचे स्पष्ट केल्यामुळे आपल्या गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करणे ही जबाबदारी या समितीवर आली आहे. ऑफ...
Especially for women | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

Especially for women | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

लेख, नांदेड
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना आता निकष झाले सोपे ;ऑफलाईनही अर्ज स्वीकारणार राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबविण्यावर भर देण्यात येत आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेत नांदेड जिल्ह्यात एकटया ग्रामीण भागात कालपर्यत 48 हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. तसेच जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय, वार्डनिहाय, गावनिहाय अर्ज भरुन घेण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर मेळावे, कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. आता या योजनेत अर्ज भरण्याची सुविधा अत्यंत सुलभ झाली असून शासनाने कागदपत्रातील निकष व अटीमध्ये शिथीलता दिली...
Dear sister scheme | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

Dear sister scheme | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्रातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्...
Sahitya Dindi | साहित्य चळवळीला गतिमान करणाऱ्या ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन संपन्न -NNL

Sahitya Dindi | साहित्य चळवळीला गतिमान करणाऱ्या ‘साहित्यदिंडी’चे प्रकाशन संपन्न -NNL

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर| मराठी साहित्यिक, ग्रंथप्रेमी, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते, साहित्य मंडळे यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 'साहित्यदिंडी'चे प्रकाशन महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. साहित्यिक, संपादक, प्रकाशक, चित्रकार, ग्रंथविक्रेते यांची सूची व सोबतच ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य पुरस्कारांचे मानकरी, २०२३मधील प्रकाशित पुस्तके आदी माहितीचा समावेश असलेली 'साहित्य दिंडी' इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशनासाठी सिद्ध करण्यात आली होती. या 'साहित्यदिंडी'चा प्रकाशन समारंभ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. प्रारंभी संपादक, प्रकाशक दत्ता डांगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मराठी साहित्य चळवळ ही गतिमान व्हावी, खेडोपाडी व वाडीतांड्यावरही लहान-मोठी साहित्य संमेलने व्हावीत, तेथील नवोदित लेखक, लेखिकांच्या साहित्याला प्रसि...
Tree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL

Tree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव ता. अर्धापूर येथे पर्यावरण जनजागृतीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून वृक्षदिंडी व वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरच्या वारीचा व दिंडीचा आदर्श डोळयासमोर ठेवून शाळेकडून नाविण्यपूर्ण वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ‘वारकरी वेष’ परिधान करुन व वृक्षाचे रोपटे हाती घेऊन आम्ही पर्यावरण वारकरी, झाडे लावू घरोघरीच्या जयघोषात वृक्षारोपणाचा संदेश दिला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या टोपीवरती लिहिलेल्या पर्यावरण वारकरी या मजकुराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व पर्यावरण रक्षणाचा मौलीक संदेश लोकांना दिला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ‘वृक्षदिंडी’ काढण्यात आली. यामध्ये इंदिरानगर शेलगावचे सरपंच पंजाबराव राजेगोरे, कृतीशिल ग्रा.पं. सदस्य तथा शिक्षणप्रेमी नागरिक गजानन पांचाळ, शिक्षणप्रेमी व समाजसेवी नागरिक सुनि...
Swami Ramanand Tirtha University | विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Swami Ramanand Tirtha University | विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये उत्कृष्ट असे खेळाचे मैदान आहे. या मैदानावर जिल्हास्तरीय पासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचे सर्व खेळ खेळले जातात. मैदान रिकामे असते तेव्हा पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मैदानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि आपले ध्येय गाठावे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते दि. १३ जुलै रोजी विद्यापीठातील मैदानावर सकाळी ८:०० वा. नांदेड शहरातून पोलीस भरती सरावासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी त्यांच्या समवेत उपस्थित होते. स. ६:०० वाजल्यापासून जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी पोलीस भरतीच्या सरावासाठी विद्यापीठाच्या मैदानावर येत आहेत. त्यांना प्रेरणा देण्यासाठी कुलगुरूंनी आज त्यांना मार्गदर्शन केले. पुढे कुल...
Successful kidney transplant | नांदेडमध्ये तिसऱ्यांदा किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ;आईने मुलाला दिले जीवनदान..! -NNL

Successful kidney transplant | नांदेडमध्ये तिसऱ्यांदा किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ;आईने मुलाला दिले जीवनदान..! -NNL

नांदेड
नांदेड| शरीरातील किडनी फेल झाल्या नंतर रुग्ण व नातेवाईक चिंताग्रस्त असतात.मुंबई -पुणे -हैदराबाद येथे उपचारासाठी रुग्ण हलविण्यात येतो .,पण किडणी रोगाची अद्यावत सुविधा आता नांदेड मध्ये श्री गंगा हॉस्पिटल मध्ये सुरू झाली असून प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण करण्यात आले असून .आईने मुलाला किडणी दान दिली आणि आपल्या लेकराला दुसऱ्यांदा पुनर्जन्म दिला. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उमरखेड तालुक्यातील गढी गावातील डाखोरे परिवार सद्गगदीद झाले. डॉक्टर साहेब ...आपले आयुष्यभर ऋण फाटणार नाहीत अशी भावना व्यक्त केली नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराच्या जवळ असलेल्या गढी या गावातील अनिल भाऊराव डाखोरे मुंबई येथील मंत्रालयातील जल संपदा विभागात कार्यरत आहेत. दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे मागील एक वर्षांपासून नांदेड येथे...
illegal business | हिमायतनगरसह ग्रामीण भागातील अवैद्य धंदे बंद करण्याचे नूतन पोलीस निरीक्षकासमोर आव्हान – NNL

illegal business | हिमायतनगरसह ग्रामीण भागातील अवैद्य धंदे बंद करण्याचे नूतन पोलीस निरीक्षकासमोर आव्हान – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| शहरासह तालुक्यातील अनेक गाव परिसरात अवैद्य धंदे राजरोसपणे चालविले जात आहेत. हे सर्व अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंटी तथा मनोज गुडेटवार यांनी केली असून, गेल्या ४ दिवसापासून ते याबाबतचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी प्रत्यक्ष मटक्याच्या बुक्कीवर जाऊन प्रसार माध्यमांना हि छायाचित्र पुरवीत आहेत. त्यामुळे हिमायतनगर शहरात सुरु असलेल्या अवैद्य धंद्यांना आवर घालण्याचे मोठे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासमोर उभे राहिले आहे. या अवैद्य धंद्याला लगाम लावण्यात नूतन पोलीस निरीक्षक यांना यश येईल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेजण वळले आहेत. मटका तथा सट्टा पट्टीवर कमी पैसा लावून जादा पैसा कमावण्याकडे तरुणांचा कल अधिक वाढला आहे. कारण कल्याण, मिलन डे- नाईट मटका आणि वि...
Prof. Bharande | अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरणाचा प्रश्न तात्काळ सोडवा- प्रा.भरांडे यांच्या उपोषणाकडे आ. हंबर्डे यांनी वेधले लक्ष -NNL

Prof. Bharande | अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरणाचा प्रश्न तात्काळ सोडवा- प्रा.भरांडे यांच्या उपोषणाकडे आ. हंबर्डे यांनी वेधले लक्ष -NNL

नांदेड
नांदेड। अनुसुचित जाती अ ब क ड वर्गीकरण लागू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रा रामचंद्र भरांडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याची बाब आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सभागृहात सभापतींच्या निदर्शनास आणून देताच सभापतींनी या प्रश्नी तात्काळ लक्ष देण्याचे आदेश शासनाला दिले. अनुसुचित जाती अ ब क ड वर्गीकरण लागु करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकस्वराज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे यांनी विधानसभेत ही मागणी लावून धरत मातंग समाजबांधवांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत पोटतिडकीने आवाज उठवला. तिला अकरा दिवसापासून प्राचार्य रामचंद्र मरांडे उपोषणाला बसले असतानाही एकाही अधिकाऱ्य...
error: Content is protected !!