या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
सध्या सजिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे, या पावसाच्या ढगांनी अचानक गर्दी केली आणि पावसाच्या सारी कोसळल्या. पाऊस येणार म्हंटल कि मोरांचा त्याची चाहूल लागते पाऊस येण्याचा आनंद व्यक्त करताना मोर पिसारा फुलवत नृत्याला प्रारंभ केल्याच्या चित्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात पाहावयास मिळाले आहे.
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी अभ्यासकेंद्रास शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नांदेड विभागीय केंद्रातून प्रवेश संख्येमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. तुळशीदास गुरनुले आणि केंद्रसंयोजक तथा उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड यांचा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माहूर परिसरातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच मुंबई , पुणे येथील कंपनीमध्ये नोकरी करून संसार चालविणाऱ्या युवांचे शिक्षण अर्धवट राहू नये, त्यांनाही दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता यावे या उदात्त हेतूने बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी २००४ मध्ये या अभ्यासकेंद्रास मान्...
भोकर| महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथील तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व येथील मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नुकतीच निवड करण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील आदर्श गाव मौजे नागपूर येथे राज्य पुरस्कार एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन 2024-25 अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळा येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी घेतली.
यावेळी येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी सदरील शेतीशाळेत सोयाबीन पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिकता तन व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल सविस्तर मार्गदर्शक केले. तसेच नॅडप/वर्मी कंपोस्ट तयार करणे,निंबोळी अर्क 5% तयार करणे ची प्रात्यक्षिक व दशपर्णी अर्क, बिजामृत,जीवामृत त...
हिमायतनगर, दत्ता शिराणे| नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले असून, खरिप पेरणीतील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, ही पिके बहरात आली आहेत. तालुक्यात सध्यातरी पिक परीस्थिती बर्यापैकी दिसून येत असली तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान सर्वदूर सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतीकाम खोळंबली असल्याचे दिसून येत असून, तालुक्यात आजपर्यत ३८३.७० मी. मी. पाऊस झाला आहे.
हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर भौगोलिक क्षेत्र असून पेरणी क्षेत्र ३९ हजार चारशे चौर्हेचाळीस आहे. यावर्षी कपाशीचा पेरा घटला असून, नगदी पीक सोयाबीनचा पेरा प्रकर्षानं वाढला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान तालुक्यात ८६७. ३० मी. मी. पाऊस सरासरी अपेक्षित आहे. मात्र यावर्षी रोहिण्या संपूर्णतः कोरड्या गेल...
मुंबई| पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आह...
नविन नांदेड| देशाच्या सर्वोच्च पदावर एका आदिवासी लाडक्या बहिणीची आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा संदेश दिला आहे. त्यांचा हा निर्णय सर्व मागास जाती- जमाती व सर्व महिलांच्या प्रगतीमध्ये अमुलाग्र बदल करणारा ठरेल व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल असे उद्गार श्री संत रोहिदास महाराज मंदिर तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेडचे मागील 40 वर्षापासूनचे संस्थापक सचिव वामनराव विष्णुपूरीकर यांनी दै. प्रजावाणी नांदेड दि. 29 जुलै 2022 रोजीच्या माध्यमातून व्यक्त केले होते.
सदरील तिर्थक्षेत्राचे प्रमुख विश्वस्त, तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील मॅडम, तत्कालीन राष्ट्रपती भारत सरकार यांची त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा पास क्रं. 002549 अन्वये दि. 3 नोव्हेंबर 2008 रोजी रितसर प्रत्यक्ष भेट घेऊन तिर्थक्षेत्राच्या विकास ...
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
तथापि 26 जुलै 2024 रोजी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव मेधा निरफराके यांनी केले आहे.
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जु...
नांदेड| प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर सात ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मच...
देगलूर| वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कुलगुरू कालिदास व गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील संस्कृत आणि हिंदी विभाग व ग्लोबल संस्कृत फोरम, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन अतिथी व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृत विभाग तर्फे डॉ. अंशुल दुबे, (असिस्टंट प्रोफेसर, तिलक महाविद्यालय औरैया, उत्तर प्रदेश) तर हिंदी विभागातर्फे डॉ. विशाल विक्रम सिंह, (राजस्थान विश्वविद्यालय जयपुर) यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. व्याख्यान सत्रामध्ये डॉ. अंशुल दुबे यांनी कालिदास आणि मेघदूत या विषयावर अत्यंत सुंदर आणि समर्पक प्रस्तुतीकरण करून आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. डॉ. विशाल विक्रम सिंह यांनी मोहन राकेश लिखीत आषाढ का एक दिन या नाट्य कथेचे उत्कृष्टपणे विस्तृत विवेचन केले.
या अतिथी व्याख्यान सत्रामध्ये महाविद्यालयाचे...
नांदेड| भुषण जवाहर राठोड वय ३४ व्यवसाय नोकरी सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड वर्ग २ याना ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार हे गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत. सदर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते. सदर फेल झालेल्या चालकांना पास करण्याचे मोबदल्यात आरोपीनी तक्रारदार यांचेकडे 10,000 हजार रुपये लाचेची मागणी केली अशी तक्रार यांनीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या समक्ष हजर राहून दिली होती.
सदर तक्रारीची आज दिनांक 25/07/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात आरोपीस तक्रारदार यांचे कडून तडजोडीअ...