Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ०७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती तर ०२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप – NNL

महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ०७ कर्मचाऱ्यांना नियुक्ती तर ०२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसास / पाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या सफाई कामगार या पदावर वारसा हक्काने वर्ग-४ संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने महापालिकेत दिनांक ३१.०७.२०२४ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते एकुण ०७ कर्मचाऱ्याऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच याच कार्यक्रमामध्ये महापालिका सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या ०२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. उच्च न्यायालयाने लाङ-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याची प्रक्रिया ही काही कालावधी पासुन थांबविली होती. तसेच काही विशिष्ट जात समुहाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच नियुक्ती देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु नजिकच्या कालावधीत अनुसुचित जाती समुहातील कर्मचाऱ्यांच्या पाल्...
Increase in bus trips from Kinwat Agra to Nanded | किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ – NNL

Increase in bus trips from Kinwat Agra to Nanded | किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.सकाळी नांदेड मार्गे लातूर पर्यंत व परत सायंकाळी नांदेड वरुन किनवट पर्यंत अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की,किनवट हा आदिवासी बहुल तालुका असून जिल्ह्यापासून दिडशे कि.मी.अंतरावर आहे.येथील लोकांना नांदेड येथे कामानिमित्त जाणे-येणे करावे लागते.या प्रवासाकरीता एसटी बसच्या फक्त दोनच फेऱ्या होत्या. रेल्वे चा आसरा आहे.पण सध्या मागील काही महिन्यांपासून रेल्वे उशीरा येणे, ऐनवेळी रद्द होणे इत्यादी गोष्टींमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून याचा परिणाम तालुक्यातील जनतेवर पडला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून बस खेळांमध्ये वाढ करण्याचा निर्णय किनवट आगारांनी घेतला असून सकाळी ०५.३० वाजता लातूरकरिता नांदेड मार्गे बस सोडण्यात येत आहे.लगेच ०६.३०,व दुप...
Organized Democracy Day on Monday | नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन -NNL

Organized Democracy Day on Monday | नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या महिन्यात लोकशाही दिन सोमवार 5 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरी...
Judgment of Bhokar District Sessions Court | हिमायतनगर येथील तत्कालीन लाचखोर लिपिक गोपेवाड यांना तीन वर्ष कारावास व चार हजार दंडाची शिक्षा – NNL

Judgment of Bhokar District Sessions Court | हिमायतनगर येथील तत्कालीन लाचखोर लिपिक गोपेवाड यांना तीन वर्ष कारावास व चार हजार दंडाची शिक्षा – NNL

नांदेड, क्राईम
भोकर/नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तहसील कार्यालयात कार्यरत तत्कालीन लोकसेवक सुनिता दत्तात्रय गोपेवाड, वय 36 वर्षे, लिपिक यांनी आंदेगाव येथील शेत गट क्रमांक 225 ची फेरफारची नक्कल देण्याच्या कामासाठी लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषसिद्धी अहवाल सादर झाल्यानंतर दिनांक 31 बुधवारी भोकर येथील मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी तीन वर्ष कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास तीन महिन्याचा वाढीव कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याची हकिकत अशी कि, यातील तक्रारदार माधव राजाराम थोटे वय 63 वर्षे यांना त्यांचे मौजे आंदेगाव येथील शेत गट क्रमांक 225 ची फेरफारची नक्कल देण्याच्या कामासाठी आरोपी लोकसेविका सुनिता दत्तात्रय गोपेवाड, वय 36 वर्षे यांनी लाचेची मागणी करून ...
Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत आयोजित जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेत आपले नैपुण्य दाखविण्यासाठी गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून 1 ते 20 ऑगस्ट, 2024 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्र, नांदेडच्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावरील शाळांनी, खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा पंच बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे. ऑलम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या तसेच जगातील सर्वोच्य सैन्याच्या संरक्षण दलात प्रशिक्षण देण्यात येणारा तायक्वॉदो खेळ आहे. या खेळामुळे शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांना स्वशिस्त, शिष्टाचार, ध्यानसाधना, संमोहनशास्त्राची प्रचिती यावी व त्यांन...
Appointment of new Police Inspector Rajesh Puri | हदगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची नियुक्ती  – NNL

Appointment of new Police Inspector Rajesh Puri | हदगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात विविध घडामोडी झाल्यानंतर पंधरा दिवसात दोन पोलीस निरीक्षक बदलून गेलेले आहे. आता हदगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरक्षक म्हणून राजेश पुरी यांची नव्यानेच नियुक्ती झाली आहे. गत काही दिवसांमध्ये हदगाव शहरात मागील पंधरवाड्यात मध्ये विविध घडामोडी घडून नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरक्षक सदाशिव भडीकर यांच्यावर काही गंभीर आरोप लागले. त्यांच्या जागी प्रभारी पोलीस निरक्षक म्हणून कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांची देखील बदली करण्यात येऊन आता हदगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरक्षक म्हणून राजेश पुरी यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे प्रभारी आहेत की, कायमस्वरूपी आहेत ही माहिती मिळू शकली नाही. हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे 50 पेक्षा जास्त गाव आणि हदगाव शहर मोठे आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत सध्या विविध अवैध धंदे वाढलेले आहेत. तसेच व...
Hadgaon city under strict lockdown | हदगाव शहर कडकडीत बंद…सामाजिक कार्यकर्ते दत्ता अंनतवार यांच्या समर्थनार्थ शहरात रँली – NNL

Hadgaon city under strict lockdown | हदगाव शहर कडकडीत बंद…सामाजिक कार्यकर्ते दत्ता अंनतवार यांच्या समर्थनार्थ शहरात रँली – NNL

नांदेड, मराठवाडा
हदगाव, शेख चांदपाशा| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणी करिता हदगाव तालुक्यात कवाना या गावी गेल्या आकरा दिवसापासुन आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार याची मागणी शासनाने त्वरीत मान्य करावी यासाठी बुधवारी हदगाव शहराच मार्केट बंद ठेवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी गेल्या ११ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र शासनाने याची साधी दाखलाही घेतली नाही. त्यामुळे सकाळ ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी हिमायतनगर बंद करून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर बुधवारी हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. यासाठी शहरातील व्यापारी ...
Lokmanya Tilak who sacrificed his life for the nation | राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक – NNL

Lokmanya Tilak who sacrificed his life for the nation | राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक – NNL

लेख
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करणार्‍या या ‘भारताच्या नरसिंहाने’ आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशात नवजागृती निर्माण केली. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची 1 ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यानिमित्त कणखर आणि जाज्ज्वल नेतृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेऊ. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत राहील. 1. वृत्तपत्रांची आवश्यकता जाणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू करणे - शाळांमधून केवळ विद्यार्थ्यांनाच शिक्षण देता येत असे; परंतु आता प्रत्येक भारतीयास त्याच्...
Dr. Kailash Yadav | नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील – डॉ.कैलाश यादव – NNL

Dr. Kailash Yadav | नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील – डॉ.कैलाश यादव – NNL

नांदेड, करियर
नांदेड| आपल्या परिसरातील घरांघरात खूप पोटेन्शिअल आहे फक्त त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते नांदेडचे नाव देशपातळीवर पोहोचवतील असे प्रतिपादन प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी केले. ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली या मंचावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव, प्रमुख पाहुणे श्री. उमेश थळंगे उपकार्यकारी अभियंता महापारेषन, जगमवाडी नांदेड तर प्रमुख उपस्थिती प्रा. प्रितम लोणेकर, मा. श्री गुणवंत मिसलवाड ( गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त) व कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे परीक्षक मा. श्री.संतोषसिह चौधरी, मा. श्री. गंगाधर चिते, मेघा गायकवाड (जोंधळे) यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले. या कार्यक्रमात ...
The approved road of Pawanmari went to someone; Villagers question…? – हिमायतनगर तालुक्यातील पावनमारीचा मंजूर रस्ता गेला कुणीकडे; ग्रामस्थांचा सवाल…? – NNL

The approved road of Pawanmari went to someone; Villagers question…? – हिमायतनगर तालुक्यातील पावनमारीचा मंजूर रस्ता गेला कुणीकडे; ग्रामस्थांचा सवाल…? – NNL

महाराष्ट्र, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याचे मंजूर काम होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. पावसाळ्यात या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी इतरत्र वळविला जात असल्याची ओरड होत असून, मग हा रस्ता गेला कुठे..? असा सवाल आता पावनमारी करांमधून उपस्थित केला जात आहे. हिमायतनगर तालुक्यात पावनमारी या गावाला जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पावनमारी करांची रस्त्याच्या बाबतीत मोठी उपेक्षा कायम होती. वेळोवेळी वर्तमान पत्रात या संदर्भाच्या बातम्या ही प्रकाशित झाल्या. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन राज्य रस्ता ते पावनमारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून १ कोटी ५० लक्ष रूपयांचा ...
error: Content is protected !!