Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Interview of District Collector on water reservoirs and water conservation : पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी आकाशवाणीचे केंद्रावर मुलाखत – NNL

Interview of District Collector on water reservoirs and water conservation : पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी आकाशवाणीचे केंद्रावर मुलाखत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठे,जलसंधारणाची कार्य, भूगर्भातील पाणी पातळी आदी विषयांवर एक विशेष मुलाखत उद्या आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून सकाळी 8.40 वाजता प्रसारित होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची ही मुलाखत असून श्रोत्यांनी या मुलाखतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे केंद्रप्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या जलसंधारणाच्या कार्यामुळे, शेततळे, नाला खोलीकरण, रूंदीकरण यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी मदत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची स्थिती यावर्षीचा पाऊस, पावसा संदर्भातील नियोजन, तसेच शेतकऱ्यांसाठी असणारा सल्ला व सामान्य नागरिकांनी भूजल पातळी वाढविण्यासाठी करावयाचे प्रयत्न, या संदर्भातील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची अभ्यासपूर्ण मुलाखत उद्या सकाळी प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे....
Shiva is the benefactor of the world : शिव जगताच कल्याण करणारी देवता – हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज – NNL

Shiva is the benefactor of the world : शिव जगताच कल्याण करणारी देवता – हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| शिव जगताच कल्याण करणारी देवता आहे.... जीवनात अडजेस्टमेंट असेल तर प्रत्येक गोष्ट सहज शक्य आहे... त्यासाठी परमेश्वरावर नितांत श्रद्धा विश्वास ठेवा नेहमी चांगलं होईल.... भगवान परमेश्वर कुणाचं कधीच वाईट करत नाही... मनुष्य जीवनात जे होत ते चांगल्यासाठी होत... असे प्रतिपादन हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांनी केलं. या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे. ते हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमातील शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवशी मंचावरून उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दि. ७ बुधवार पासून शिव महापुराण कथा वाचन, पठनास सुरुवात झाली असून, हा धार्मिक सत्संग कार्यक्रम सलग सात दिवस चालणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कथेला प्रारंभ होणा...
बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

देश विदेश, मुंबई
मुंबई| बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बांगलादेशाती...
समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – NNL

समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील नवा मोंढा भागातील प्रतिथयश उद्योजक तथा वेंकटेश्वरा अग्रो एजन्सी चे संचालक व समाजसेवक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता बिगारी कामगारांच्या मुलांना हिंगोली नाका येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा येथे मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व फळ तसेच खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर सुमन बालग्रह येथे त्यांचा वाढदिवस अनाथ मुलींसमवेत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी श्री सचिन कासलीवाल यांनी येथील मुलींना पालकाची कमी भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. पुढे बोलतांना त्यांनी या सर्व अनाथ मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली व लागलीच त्यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींसाठी उपयुक्त औषधी तसेच फळे व शालेय साहित्य ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर रुग्णांवर केले यशस्वी उपचार – NNL

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर रुग्णांवर केले यशस्वी उपचार – NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निकीता रविंद्र अवतारे, वय 35 वर्ष रा. गाडीपुरा नांदेड यांना 3 ऑगस्ट 2024 रोजी पोटामध्ये दुखत असल्यामुळे दाखल दाखल केले होते. या रुग्णाच्या विविध चाचण्या व तपासण्या करुन रुग्णास चीरा हर्निया असल्याचे निदान करण्यात झाले. या रुग्णावर अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विद्याधर केळकर यांनी व त्यांचे चमुने अति गुंतागुतीची शस्त्रक्रीया करुन रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा होईल या दृष्टीने उपचार केले. तसेच दुसरा रुग्ण श्रीमती अजमा बेगम लईस खान वय 26 वर्षे रा. अर्धापूर यांना 26 जुलै रोजी पोट फुगल्याने रुगणालयात दाखल केले होते. त्या अत्यवस्थ व अतिगंभीर स्थितीत रुग्णालयास तपासणी व उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. आतड्यांसंबंधी छिद्र (Intestinal perforation) निदान झ...
Secondary essay office decorated for revenue fortnight : महसूल पंधरवडयानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय सजले – NNL

Secondary essay office decorated for revenue fortnight : महसूल पंधरवडयानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय सजले – NNL

नांदेड, महाराष्ट्र
अर्धापूर| येथील प्रशासकीय इमारतीमधील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल पंधरवडा दिन साजरा करण्यात आला. कार्यालयामध्ये आणि बाहेर रंगीबेरंगी फुले, फुगे लावून कार्यालयाची सजावट करण्यात आली. कार्यालय पक्षकारांचे स्वागतच करीत आहे, असे गौरव उद्गगार अनेक पक्षकांनी काढले. दुय्यम निबंधक श्रेणी १ व्ही. बी. पदमवार यांच्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात शासनाच्या खात्यात महसूल जमा झाल्याचे दुय्यम निबंधकानी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील अगदी जवळचा आणि बागायती असलेला अर्धापुर तालुका महाराष्ट्र राज्याला परिचित आहे. मागीलवर्षी या कार्यालयात 1 हजार 977 दस्त नोंदनी झाली आहे. आठ कोटी बारा लाख 90 हजार 30 रुपये एवढा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात हे कार्यालय अव्वल ठरले असल्याची माहिती दुय्यम निबंधक व्ही.बी. पदमवार यांनी दिली. शासनास जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्यास महामार...
विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

विना परवाना जनावरांची वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडीसह दोन जनावरं पकडली – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील सार्वजनिक बांधकाम विगाग कार्यालयानजीक शासकीय विश्रामगृहा जवळ विना परवाना दोन जनावरांना घेवून वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडी पोलीसांनी पकडली. हि कारवाई दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील किनवट, नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, शासकीय विश्रामगृहासमोर एक टाटा मॅजिक गाडी एम. एच. २६ बी. ई. ८३७९ किंमत ४ लक्ष रूपयांच्या गाडी मध्ये दोन जनावरे अतिशय क्रूरपणे, त्यांच्या जीवितास इजा पोहचण्याचा इराद्याने व तसेच कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलीसांनी पकडले. हि कारवाई सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान करण्यात आली असून दोन जनावरे किंमत १६ हजार वाहनाची किंमत ४ लाख रूपये असा एकूण ४ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. हिम...
Arrival at Sri Guru Gobind Singh Ji Airport in Nanded for Women’s Gathering : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या पसंतीस उतरली – अदिती तटकरे – NNL

Arrival at Sri Guru Gobind Singh Ji Airport in Nanded for Women’s Gathering : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या पसंतीस उतरली – अदिती तटकरे – NNL

नांदेड, फोटो गॅलरी
नांदेड राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांचे जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्याधिकारी मीनल करणवाल व शालेय विद्यार्थिनींनी त्यांचा पुष्पगुछ देऊन स्वागत केल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या पसंतीस उतरल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले....
Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL

Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक अकाउंट, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे, या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज त्यांचे नांदेडच्या श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दुपारी चार वाजता आगमन झाले. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मेळाव्यात बोलताना त्यांनी रक्षाबंधनपूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची शाश्वती दिली. राज्यामध्ये एक कोटी 40 लक्ष अर्ज आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला ...
Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ – NNL

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ – NNL

महाराष्ट्र, मुंबई
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे. प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, ...
error: Content is protected !!