Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
आय आय.टी. मधील विद्यार्थ्याच्या बरोबरीने एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थी अग्रवालची जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी -NNL

आय आय.टी. मधील विद्यार्थ्याच्या बरोबरीने एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थी अग्रवालची जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपूरी नांदेड मध्ये तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स (EXTC)मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी अनुज अग्रवाल, यांनी देश पातळीवर एस.जी.जी.एस.संस्थेची गुंणवत्ता सिद्ध करत गुरुजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःचे कठोर परिश्रम व जिद्धीच्या जोरावर अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या लिनक्स (Linux) फाउंडेशन मेंटॉरशिप, एल.एफ.एक्स. (LFX)प्रोग्राम मधील यशाला गवसणी घातली आहे,त्यासाठी त्याला १२-आठवड्यांच्या कालावधीसाठी (तीन महिने) ₹ २.५ लाख (अंदाजे ३,००० डॉलर) स्टायपेंड मिळालेले आहे. ही कामगिरी विशेषत: निवड प्रक्रियेच्या अतिउच्च काठीण्य पातळी मुळे लक्षात घेण्याजोगी आहे. या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यामधील तांत्रिक कौशल्याचा कस लागतो. या जागतिक पातळी वरील स्पर्धेत पाच टक्के (५%) पेक्षा कमी अर्जदार निवडले जातात आणि बहुत...
Action against Gutkha transporters : ऑपरेशन फ्लश ऑऊट अनुसार गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही; 86206/- रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Action against Gutkha transporters : ऑपरेशन फ्लश ऑऊट अनुसार गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही; 86206/- रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य धंदयांची माहिती काढुन कार्यवाही करण्या बाबत पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आदेशीत केले होते. दि.30/08/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. श्री रमेश गायकवाड, सपोउपनि. देविदास बिसाडे, पोहेकॉ./664 मोहन हाक्के, पोना./2556 लक्ष्मण दासरवार, पोकॉ./493 संघरत्न गायकवाड दिनांक 30/08/2024 रोजी अवैद्य धंदयांची माहिती काढुन केसेस करणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मॅफको रोड राजा पॅलेस फंक्शनहॉल समोर सार्वजनिक रोडवर इतवारा नांदेड येथे एक इसम अॅक्टीव्हा मो.सा. वर गुटखा घेवुन जात आहे. याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी 17.15 वा. छापा मारला असता तेथे एक इसम अॅक्टीव्हा ...
Jyotiba kharate ; ज्योतीबा खराटे यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता -NNL

Jyotiba kharate ; ज्योतीबा खराटे यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहेरे। शिवसेना पक्षाचे किनवट-माहुर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या वर पंचायत समितीचे तात्कालीन गटविकास अधिकारी यु.डी.मांदाडे यांनी राजकीय दबावाला बळी पडून सन २०१७ मध्ये पोलिस स्टेशन माहुर येथे फिर्याद देऊन भा.द.वी कलम ३५३,२९४,५०६ अनव्ये गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातून ज्योतीबा खराटे यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली. माहूर पंचायत समितीचे तात्कालीन गटविकास अधिकारी उद्धव मांदाडे यांनी शिवसेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विधानसभा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या विरोधात दि.१२ जुन २०१७ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल केला होता. सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल धावरे यांनी केला होता. तपासणी अंती त्यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते, या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाल...
Prime Minister Narendra Modi : वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार  – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Prime Minister Narendra Modi : वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

देश विदेश
पालघर| देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  केले. सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्...
“Special Brief Review Program” announced : “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर -NNL

“Special Brief Review Program” announced : “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर -NNL

महाराष्ट्र
मुंबई| राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” कार्यक्रम दि.25.06.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार आज दि.30.08.2024 रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” अतंर्गत दि.06.08.2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच प्रारुप याद्यांसाठी दि.06.08.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या. दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रार...
Ban on flying man-made objects with drone cameras : नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध -NNL

Ban on flying man-made objects with drone cameras : नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात, शहरात, गुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळाच्या परिसरात 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 4 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे. सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन ...
Shahubai Kshirsagar passed away : ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन -NNL

Shahubai Kshirsagar passed away : ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। येथील वरिष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका कमाडंन्ट प्रकाश कांबळे यांच्या आजी श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांचे आज दि.31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता अकोला येथे दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून आजारी होत्या. मुळच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांनी पतीच्या अकाली निधनानंतर दोन्ही मुलींना शिक्षणाची कास धरायला लावली. अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना मोल मजुरी करून त्यांनी मुलींचे संगोपन केले. श्रम करून स्वाभीमानाने जगण्याची शिकवण सर्व आप्तजणांना दिली. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या श्रीमती शाहूबाई क्षीरसागर यांनी सर्व नातवंडे आणि पण...
Vyoshree and Tirthadarshan : सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री व तिर्थदर्शन’ योजनेची लाभ …भास्कर अण्णा तुम्मा -NNL

Vyoshree and Tirthadarshan : सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री व तिर्थदर्शन’ योजनेची लाभ …भास्कर अण्णा तुम्मा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| झोपडपट्टी भागात राज्य शासनाच्या लाभकारी योजना गरीब गरजू लोकांना व खरे लाभार्थना सरकारचे सर्व लाभकारी योजना पोहचावी या संकल्पनेतून भास्कर अण्णा तुम्मा यांनी नांदेड मध्ये आज दिनांक ३०/०८/२०२४ रोजी गंगाचाळ येथील मार्कंडेय मंदिर मध्ये सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीर घेण्यात आले. या शिबीर मध्ये नांदेड समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे, समाज कल्याण विभागाचे अधिकारी सुजाता पोहरे,दिगंबर पोतुलवार, विठ्ठल दुगळे, विजय पकाने, ज्योती जाधव या सर्व प्रमुख अधिकारी उपस्थितित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना योजनेची सविस्तर माहिती सांगून मोफत फॉर्म भरून स्वीकारण्यात आले असता या शिबीर मध्ये भास्कर अण्णा मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनी जमलेल्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या खूप मोठी गर्दी होती! भास्कर अण्...
two accused arrested : देगलुर येथील कारची काच फोडुन लंपास केलेल्या रकमपैकी 10,00,000/- रोख रक्कम जप्त, दोन आरोपी निष्पन्न -NNL

two accused arrested : देगलुर येथील कारची काच फोडुन लंपास केलेल्या रकमपैकी 10,00,000/- रोख रक्कम जप्त, दोन आरोपी निष्पन्न -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. पोलीस ठाणे देगलुर हद्दीतुन दिनांक 16/08/2024 रोजी कार्यक्रमास आलेल्या फिर्यादीचे कारचा काच फोडुन कार मधील 14,00,000/- रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्यावरुन पोलीस ठाणे देगलुर येथे गुरनं. 394/2024 कलम 305 भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल होता. नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन गेलेली रक्कम हस्तगत करण्याबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी सपोनि / संतोष शेकडे यांचे पथकास आदेशीत केले होते. त्यावरुन स्थागुशाचे पथकांने मिळालेल्या गुप्त बातमीआधारे दिनांक 29...
Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय,सिडको तर्फे दि.३० ऑगस्ट रोजी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व संवर्धन,संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली.या निमित्ताने सर्वप्रथम प्रभात फेरीचे अर्थात वृक्षदंडीचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे उपमुख्याद्यापक रवी शिवाजीराव जाधव व सौ.निमा कदम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन दिंडीस सुरुवात करण्यात आली.या प्रभातफेरीच्या माध्यमातून मुख्य रस्त्याने जन जागृतीपर घोषणा देण्यात आल्या. वृक्ष दिंडीच्या प्रमुख सौ. व्ही. यु.भाले यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षदिंडीमध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 'वनश्री हीच- धनश्री', 'झाडे लावा - झाडे जगवा', 'वृक्ष जगवा - जीवन फुलवा' , 'झाड तेथे पाखरू - धरतीचे लेकरू' अशा घोषणांनी सिडको परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घ...
error: Content is protected !!