किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट तालुक्यातील 62 तांड्यांना न्याय मिळवून देणार व कुठलाही भेदभाव न ठेवता समान निधीचे वाटप करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा संध्याताई राठोड यांनी दयाळ धानोरा येथील भूमिपूजनाप्रसंगी व्यक्त केले. बुरकुलवाडी या ठिकाणी दहा लक्ष रोडा नाईक ठिकाणी दहा लक्ष तर दयाळ धानोरा या ठिकाणच्या दोन तांड्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत बंजारा लमान तांड्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा पवार व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 213 लमाण तांड्यांचा विकास करण्यासाठी 21 कोटी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याने 14 ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेअंतर्गत निवड झालेल्या किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल मधील बुरकुलवाडी, रोडा नाईक तांडा, व दयाळ धानोरा तांडा येथे नांदेड जिल्हा परिषदेच्या संत सेवालाल तांडा वस्ती समितीच्या अशासकीय सदस्य तथा भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ संध्याताई प्रफुल राठोड व संत सेवालाल तांडा वस्ती समितीचे अशासकीय सदस्य प्रकाश राठोड, कैलास खसावत,रमेश पडवळ,भगवान राठोड ,लवकुंश जाधव ,विष्णू राठोड तालुका समन्वयक, यांनी दयाळ धानोरा तांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन या निधीचा आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यासाठी व पारदर्शकपणे कार्य करण्यासाठी सरपंच व गावकरी यांना मार्गदर्शन करून. संत सेवालाल महाराज मंदिराचे सुशोभीकरण करणे तांड्यातील अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे संत सेवाभाया सभागृह शेड सह बांधकाम करण्यासाठी सरपंच. नायक व कारभारी आणि उपस्थित बंजारा समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत सेवालाल महाराज मंदिराच्या संरक्षण भिंत वॉल कंपाऊंड बांधकामांचे भूमिपूजन सौ संध्याताई राठोड व प्रकाश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या संत सेवालाल तांडा वस्ती समितीच्या अशासकीय सदस्य भाजपाचे प्रकाश राठोड यांनी जिल्ह्यातील बंजारा लमान तांड्याचा विकास करण्यासाठी 21 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी संत सेवालाल तांडा वस्ती समितीचे अशासकीय सदस्य कैलास खसावत रमेश पडवळ लवकुंश जाधव भाजपाचे विष्णू राठोड सरपंच बाबूलाल नारायण जाधव, उपसरपंच रोहिदास हरी जाधवग्रा. सदस्य प्रशांत जाधव, माजी सैनिक प्रकाश जाधव, ग्रामसेवक शिवाजी धरणे, दयाळ धानोरा तांडा येथील कारभारी, नायक, व बंजारा समाजाच्या महिलांसह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होत्या