Sandhyatai Rathod ; तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार – संध्याताई राठोड – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट तालुक्यातील 62 तांड्यांना न्याय मिळवून देणार व कुठलाही भेदभाव न ठेवता समान निधीचे वाटप करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा संध्याताई राठोड यांनी दयाळ धानोरा येथील भूमिपूजनाप्रसंगी व्यक्त केले. बुरकुलवाडी या ठिकाणी दहा लक्ष रोडा नाईक ठिकाणी दहा लक्ष तर दयाळ धानोरा या ठिकाणच्या दोन तांड्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत बंजारा लमान तांड्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा पवार व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 213 लमाण तांड्यांचा विकास करण्यासाठी 21 कोटी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर केल्...
