नांदेड| शहरातील विमानतळ पोलीसांनी डोरोड्याच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन यांच्याकडून 3 लक्ष 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंतर्गत जिल्हयातील सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01.10.2024 रोजी 19.30 वा. चे सुमारास पोस्टे विमानतळ हद्दीत माळटेकडी ब्रिजच्याखाली सहा आरोपीतांनी संगणमत करून खंजरचा धाक दाखवुन दरोडा घातला होता. सदर गुन्हयात फिर्यादीचा मोटोरोला एच 40 कंपणीचा मोबाईल किंमती 20,000/- रुपयाचा जबरीने चोरून नेल्याने पोस्टे विमानतळ गुरन 405/2024 कलम 310 (2) बीएनएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचा तपासा संबंधाने गुन्हे शोध पथक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना गुप्त बातमीदारां मार्फत माहीती मिळाली की. 1) शेख इलीयास शेख ईरफान, वय 23 वर्षे, रा. पाकीजानगर नांदेड 2) मोहम्मद फेरोज मोहम्मद हमीद, वय 19 वर्षे, रा. खुदबेनगर 3) शेख शाहेद रा. देगलुर नाका व तीन विधीसंघर्ष बालक यांनी सदर गुन्हा केल्याचे समजले. त्यावरून गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी यातील आरोपी क्रमांक 01 व 02 व दोन विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली.
यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेला मोटोराकला एच 40 कंपणीचा मोबाईल किंमती 20,000/-रू चा व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटारसायकली किंमती 1,05,000/- रू व दहा वेगवेगळ्या कंपणीचे मोबाईल किंमती 2,02,000/-रू असा एकुण 3,27.000/-रू चा मुद्येमाल व एक खंजर जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार असुन, त्यांचा पण शोध घेणे चालु आहे. सदरचा गुन्हा घडल्या नंतर 12 तासाचे आत चार आरोपीतांना ताब्यात घेतले असुन त्यात दोन सज्ञान असुन, दोन विधीसंघर्स बालक आहेत.
सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती किरतीका सि. एम. सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग नांदेड शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि गणेश चव्हाण, पोउपनि विनोद साने, गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ दारासिंग राठोड, शेख जावेद, पोकों शेख शोएब, राजेश माने, हरप्रितसिंघ सुखई, नागनाथ स्वामी, दिगंबर डोईफोडे, चालक पोउपनि गोरख भोसीकर यांनी पार पाडुन चांगली कामकीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.