Wednesday, May 13

Tag: the valuables worth Rs.3

Airport police : विमानतळ पोलीसांनी दरोडा गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन 3,27,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Airport police : विमानतळ पोलीसांनी दरोडा गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन 3,27,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील विमानतळ पोलीसांनी डोरोड्याच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन यांच्याकडून 3 लक्ष 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंतर्गत जिल्हयातील सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01.10.2024 रोजी 19.30 वा. चे सुमारास पोस्टे विमानतळ हद्दीत माळटेकडी ब्रिजच्याखाली सहा आरोपीतांनी संगणमत करून खंजरचा धाक दाखवुन दरोडा घातला होता. सदर गुन्हयात फिर्यादीचा मोटोरोला एच 40 कंपणीचा मोबाईल किंमती 20,000/- रुपयाचा जबरीने चोरून नेल्याने पोस्टे विमानतळ गुरन 405/2024 कलम 310 (2) बीएनएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपासा संबंधाने गुन्हे शोध पथक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असता...
error: Content is protected !!