नवीन नांदेड| ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील ७ ऑक्टोबर रोजी रात्रीचा सुमारास शालेय रूमच्यी लाकडी खिडकी तोडून आत प्रवेश करून कपाटातुन तेवीस रजिस्टर एकुण किमंत आठ हजार पाचशे चोरून नेल्या प्रकरणी मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ,या प्रकरणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक करून मुदेमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये सन 1988 ते 2024 पर्यंत निर्गम.
विद्यार्थी नोंद रजिस्टर सन 2023 पासून आज पर्यंतची टी. सी. बुक ,सन 2024 ते 2025 ची विद्यार्थी उपस्थिती पट,सन 2023 ते आतापर्यंतचे शालेय पोषण रजिस्टर , सन 2021 पासुनचे शालेय समीती रजिस्टर ,शाळा व्यवस्थापण समीती रजीस्टर सन 2021 पासुन,विद्यार्थी प्रवेश फाईल सन 2024 ते 2025 ची ,गोपणीय अव्हालाचे रजिस्टर ,सुचना रजिस्टर , शाळेचे लेटर पेंड ,शिक्षक उपस्थिती पट 2022,2023,2024 चे रजिस्टर , विद्यार्थाचे सर्व पेपर्स ,आवक जावक फाईल ,एल.आय.सि.संचिका बैंक कपात फाईल ,शिक्षक रजा फाईल , सावित्रीबाई फुले विद्यार्थी शिष्यवर्ती फाईल ,विद्यार्थी गोषवारा रजिस्टर सन 2023 ते 2024 ,अभिप्राय रजिस्टर , इतर रजिस्टर , सखी सावित्री दक्षता समिती रजिस्टर ,सखी सावित्री कमीटी रजिस्टर ,बैठक रजिस्टर असे रजिस्टर एकुण कि. अं. 8,500/- रुपयाचे चोरीस गेले होते.
या प्रकरणी मुख्याध्यापिका निर्मला गंगाराम कांबळे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. अज्ञात आरोपीने ज्ञानदिप प्राथमीक शाळा बळीरामपुर येथील शाळेचे ऑफीसच्या रुमची लाकडी खिडकी तोडुन त्याद्वारे आत प्रवेश करुन कपाटातील एकुण 23 रजिस्टर एकुण कि.अं. 8,500/- रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे वगैरे फिर्यादि वरुन गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहकॉ मुपडे यांचे कडे दिला होता.
अखेर पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक महेश कोरे ,पोलीस अंमलदार संतोष जाधव,शंकर मळगे,माधव माने यांच्या पथकाने या गुन्हयातील आरोपी सुशांत संभाजी जौधंळे यास बळीरामपुर भागातून चोरीचा मुदेमालासह अटक केली आहे.