उस्माननगर l दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उस्माननगर ता.कंधार येथे हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतिक असलेल्या अब्दुल रहेमान बाबा सैलानी संदलाचे आयोजन दि.२१ एप्रिल रोजी आयोजन ( सरकार बाबा ) मुख्य आयोजक इस्माईल तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले आहे. उस्माननगर ता.कंधार येथील ( सरकार )इस्माईल तांबोळी ( बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होळी सण उत्सवास बुलढाणा येथे भक्तांना नेतात.


होळीचा सण झाल्यानंतर उस्माननगर येथे सैलानी बाबा यांचा संदल हार्षउल्हासासध्ये भव्य संदल मिरवणूक काढण्यात येते. दि.२१ एप्रिल रोजी सोमवारी सायंकाळी येथील पुजारी इब्राहिम तांबोळी यांच्या घरापासून पुजा करुन प्रमुख रस्त्याने ढोल ताशा , फटाक्यांची आतिषबाजी करीत अश्व ( घोडे) यांच्या निनादात संदल मिरवणूक फजले मौला दर्गा येथे चादर चढून गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार असून , घरी परत येऊन सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी परिसरातील भाविक भक्तांनी अब्दुल रहेमान बाबा सैलानी बाबा संदलास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संदेश वाघमारे , राजू शेख , सुनील महाराज. , सत्तार शेख , रयाजोद्दीन शेख , विष्णु कांबळे , संजू लंकाढाई ,निजामोद्दीन शेख , उमाकांत भिसे , साहेबराव भिसे , देविदास धोंगडे , विक्की कांबळे , बंडु पाडदे , माजिदभाई शेख. , चंद्रकांत घोरबांड , गजू पाटील काळम , मन्मथ मोरे , गफार शेख , इरशाद तांबोळी , सद्दाम पिंजारी. , शिवाजी भिसे , सुशिल वाघमारे , बालाजी जाधव सिडको , मगदुम तांबोळी , चांदु बाबळे , राहुल भैया यांच्या सह (सरकार) इस्माईल तांबोळी बाबा मित्र मंडळ उस्माननगर यांनी केले आहे.




