हिमायतनगर,अनिल मादसवार। विषारी साप चावल्याने पावनमारी येथील युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, युवक फवारणीसाठी मजूर शोधण्यासाठी विविध गावाला गेला होता. मजूर भेटला नसल्याने परत गावाकडे येत असताना सोयाबीनमध्ये दडून बसलेल्या विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार दोन दिवसांनी युवकांचा शोधाशोध घेतल्यानंतर निदर्शनास आला आहे. संजय दादाराव जाधव असे मयत युवा शेतकऱ्याचं नाव आहे. केवळ शेताच्या रस्त्याने जात असल्याने सापाने शेतकऱ्यास चावा घेतला जर पावनमारी गावच्या रस्ता यापूर्वीच झाला असता तर आज युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसता असेही गावकऱ्यातून बोलले जात आहे. या घटनेवरून हदगाव हिमायतनगर तालुक्याचा विकास मीच केला..? असे सांगत वर्तमान पात्रातून पेड बातम्या व जाहिरातीच्या माध्यमातून विकासाच्या वल्गना करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या खोटारडेपणा जनतेच्या समोर येऊ लागलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजे पावनमारी येथील अल्प भूधारक शेतकरी संजय दादाराव जाधव हे नेहमी प्रमाणे सकाळी उठून आपले शेतात गेले. तिथून सोयाबीनला फवारणी करण्यासाठी गावत रोजदार मिळत नाही म्हणुन, शेजारीच असलेल्या मौजे खडकी बाजार येथून रोजगार आणण्यासाठी गेले होते. नागपंचमीचा सन असल्याने तिथे ही त्यांना रोजदार मिळाला नाही. तिथून पाई परत त्यांचे शेताचे रस्त्याने येत असताना वाढलेल्या सोयाबीन मध्ये लपलेल्या अतिविषारी सापाने चावा घेतल्याने त्यांचा तिथेच शेतात पडून मृत्यू झाला.
इकडे गावातील मंडळी व घरचे नातेवाईक शोधा शोध घेऊ लागले पण त्यांचा कुठेच शोध लागत नव्हता. त्यामुळे दिनांक 13 तारखेचा दिवस निघून गेल्यानंतर खडकी या गावातून समजले की, रोजगार पहाण्यास मयत युवा शेतकरी खडकी मध्ये आले होते. आणि जुन्या पाउल वाटेने पाई पावनमारी कडे गेले तेव्हां जुन्या वाटेकडे पाहणी केली. यावेळी शेतकरी युवक सोयाबीनच्या शेतात रस्त्याच्या कडेला मृत्य अवस्थेत आढळून आला. याची माहीत त्यांचे चुलता भाऊ यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कळवली. त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी शवविच्छदेनं करून रात्री उशिरा त्यांचेवर पावनमारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांचे मृत्यू पाश्चात्य पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ बांधकी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि अंतर्गत रस्ता नाही. या गावाची ग्रामपंचायत टेंभूर्णी, राशन दुकान टेंभूर्णी उपआरोग्य केंद्र विरसनी जि. प. पंचायत समिती मतदान केंद्र टेंभूर्णी येथे आहे. तर तलाठी सज्जा खडकी, विधानसभा / लोकसभा मतदान केंद्र खडकी, जवळचे रेल्वे स्टेशन खडकी व मुख्य बाजारपेठ हिमायतनगर आहे. तरी हे गाव टेंभूर्णी किंवा खडकीकडे अद्याप पक्क्या रस्त्याने जोडले नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, उपजीविका या मुलभूत सोई पासून गाव कोसो दूर आहे. या रस्त्यासाठी आम्ही २५ वर्षांपासून भांडत आहोत मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. जर हा रस्ता झाला असता तर आमच्या युवा शेतकऱ्याचं मृत्यू झाला नसता, त्यामुळे पुन्हा सह्या घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने तात्काळ रस्ता करून द्यावा अशी रास्त मागणी सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांनी केली आहे.