नांदेड। इतवारा पोलीसांकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 8,00,000 /- रु नगदी रक्कम व वाहन किमंती 10,00,000/- रु असा एकुण 18,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक करुन अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी संबधाने दिनांक 08/11/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोउपनि, विलास पवार, गुन्हे शोध पथक, बिट मार्शल 01 व 04 असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना 12.30 वाजताचे सुमारास बर्की चौक नांदेड याठिकाणी CMD Connecting Commerce असे नाव असलेली बंद बॉडीची MH 14-LB-1281 या क्रंमाकाची चारचाकी वाहन आढळुन आले.
सदरचे चारचाकी वाहन थांबवुन तपासणी केली असता त्या वाहनामध्ये 8,00,000/- रुपयाची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे याबाबत सदर वाहनामधील व्यक्तीनां विचारले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणून सदर रक्कम व वाहन पंचासमक्ष जप्त करुन निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केले आहे.
वरील सर्व कारवाईमध्ये एफएसटी, आयटी, इत्यादी संबधीत एजन्सीनां सुचीत केले आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टल मध्ये सदर जप्तीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सदर रक्कमे बाबत संबधीत एजन्सीज या पुढील चौकशी करुन पुढील योग्य ती कारवाई त्यांच्याकडुन केली जाणार आहे.
इतवारा पोलीसांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 8,00,000/- रु नगदी रक्कम व 10,00,000/- रु किंमतीची वाहन अशी एकुण 18,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगीरी हे पोलीस स्टेशन इतवारा प्रभारी अधिकारी श्री रणजीत भोईटे व त्यांच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांने त्यांचे अभिनंदन केले आहे.