किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पदविधर शिक्षक अंकुश राऊत बोलत होते. NEP 2020 मध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. FLN अंतर्गत शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे 25 जून 2024 रोजी सर्व शाळेमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जात आहे.
भारताच्या सांस्कृतिक कला मोहत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत आहोत यामध्ये शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व समुदायाच्या सहभागाने आपल्या भागातील वेगवेगळे नृत्य, परंपरेचा आदर विविध सांस्कृतिक आणि कलेचा वापर करून शाळेमध्ये विविध भाषा वेशभूषा, कला, नृत्य, गाणी, नाटक, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारे वेशभूषा, नाटक, लोकनृत्य व डान्स तसेच गावातील मातांनी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा संगीत खुर्ची या सारखे खेळ घेतले. तसेच शिक्षकांनी सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन एक गावामध्ये आनंद उत्सव साजरा केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर, अंकुश राऊत, राहुल तमगडगे, विद्या श्रीमेवार, तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अनंता वायसे व गौरव उपासे आणि अंगणवाडी सेविका शोभाताई मेश्राम, नंदाताई वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, उपाध्यक्ष प्रिया कदम यांच्यासह माता पालक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. मुलांनी छान आनंद व्यक्त केला.