Friday, June 26

Datta Jayanti : हिमायतनगरमध्ये दत्त जयंती निमित्त “गुरुचरित्र” पारायणाचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

हिमायतनगर| येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीचे औचित्य साधून “गुरुचरित्र” पारायणाचा सांगता सोहळा आज अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदी वातावरणात पार पडला. परिसर भक्तिरसाने आणि दत्तगुरूंच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

यावेळी आयोजित भक्तीरचना आणि भक्तीसंगीत कार्यक्रमाने उपस्थितांना अध्यात्मिक आनंदाने मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमात गायक कलाकार सौ. माधुरीताई जाधव, परमेश्वर रेड्डी तिप्पनवार यांची विशेष उपस्थिती होती. साथ-संगत म्हणून सचिन बोंपीलवार, कृष्णा बोंपीलवार, अनिल तलवारे आणि रामेश्वर मोरे यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक सुरेल केला.

भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दत्तगुरू व श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी कृतज्ञतेचे व भक्तीभावाचे वंदन अर्पण केले. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उल्हासित, भक्तिरसपूर्ण व भाविकांनी भरलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!