Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई
  • Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - showcase the talents : राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा
नांदेड करियर मुंबई February 5, 2025

showcase the talents : राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा

सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच; टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
NNL TeamBy NNL TeamFebruary 5, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन आणि टॅगलाईन स्पर्धेच्या प्रवेशिका स्पर्धकांनी दिनांक ५ ते १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने पाठवाव्या. स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचे परीक्षण करून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिनी’ विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येतील. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

उपयोजित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून क्रिएटिव्ह संकल्पना, डिझाईन तसेच उत्कृष्ट टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. डिजिटल डिझाइन मध्ये पोस्टर्स, सोशल मीडिया क्रिएटिव्ह, बॅनर्स, इन्फोग्राफिक्स तसेच प्रिंट डिझाइनमध्ये पोस्टर्स, फ्लायर्स, ब्रोशर्स, बॅनर्स, स्टॅण्डीज अशा स्वरूपाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खुली असून सहभागी होणाऱ्यास वेगवेगळ्या स्पर्धांसाठी एकूण 3 प्रवेशिका पाठविता येतील.

विजेत्यांना मिळणार ही बक्षीसे –
प्रथम पारितोषक विजेता (१) – २५ हजार रुपये
द्वितीय पारितोषक विजेता (१) – १५ हजार रुपये
तृतीय पारितोषक विजेता (१) – १० हजार तसेच
उत्तेजनार्थ म्हणून एकूण १५ स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

असे आहेत स्पर्धेचे विषय – बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, मेट्रो, परिवहन , सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा, पर्यटन, राजशिष्टाचार, मृद व जलसंधारण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, गृह, राज्य उत्पादन शुल्क, विधी व न्याय, कामगार, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, दिव्यांग कल्याण, इतर मागास व बहुजन कल्याण, वने, पर्यावरण व वातावरणीय बदल, ऊर्जा, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना, महिला व बालविकास, क्रीडा व युवक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, सामान्य प्रशासन/वित्त व नियोजन/ माहिती व तंत्रज्ञान, कृषि/सहकार/पणन, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय/फलोत्पादन, महसूल, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

अशा आहेत स्पर्धेच्या अटी व शर्ती – सादरीकरणे मूळ आणि सहभागी स्पर्धकांनी स्वत:ने तयार केलेली असावी. सादरीकरण कोणत्याही कॉपीराइट किंवा बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करणारी नसावीत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला सादर केलेली कोणतीही रचनात्मक सामग्री प्रचार, विपणन, किंवा प्रकाशन उद्देशाने वापरण्याचा अधिकार महासंचालनालयाला असेल. अंतिम निर्णय महासंचालनालयाचा असेल. विजेते ईमेलद्वारे सूचित केले जातील आणि अधिकृत मंचावर जाहीर केले जातील. कोणतीही कॉपीराइट सामग्री वापरली जाऊ नये. असभ्य भाषा/आक्षेपार्ह शब्द/हिंसात्मक भाषा वापरण्यास बंदी असून राज्य शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सहभागींनी महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे माहितीपट सादर करणे आवश्यक आहे. डिजिटलसाठी JPEG/PNG/PDF (प्रिंट डिझाइनसाठी किमान 300 dpi रिझोल्यूशन) असणे आवश्यक आहे. तर व्हिडिओसाठी एचडी असल्यास HD 1280 X 720 पिक्सेल तसेच फुल एचडी असल्यास 1920 x 1080 पिक्सेल असणे आवश्यक आहे. पोस्टर्स: A3 आकार (297 x 420 मिमी). सोशल मीडिया क्रिएटिव्ह: 1080 x 1080 पिक्सेल, फ्लायर्स/ब्रॉशर्स: A4 आकार (210 x 297 मिमी) स्वरुपात असणे आवश्यक आहे.

असे आहेत स्पर्धेचे निकष… जाहिरात किती अनोखी आणि कल्पक आहे. ती इतरांपासून वेगळी आहे का? संकल्पना ताज्या आणि नाविन्यपूर्ण आहेत का हे परीक्षकांकडून तपासण्यात येतील. जाहिरात नवीन विचार किंवा पद्धतीवर तसेच रचनात्मक पद्धतीने सादर करण्यात आली आहे का हे पाहण्यात येईल. जाहिरात प्रेक्षकांवर कोणता भावनिक किंवा मानसिक प्रतिसाद निर्माण करते. ती लक्ष वेधून घेते का, प्रभावशाली प्रतिक्रिया निर्माण करते का, किंवा समज बदलते का?याचा विचार यावेळी होईल. जाहिरातीचे सौंदर्यशास्त्र. ती दृश्यात्मकदृष्ट्या आकर्षक आहे का?, मांडणी नीटनेटकी आहे का?, आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवते का हे पाहण्यात येईल. जाहिरातमधील लिखित सामग्रीची गुणवत्ता. भाषा स्पष्ट, आकर्षक आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवणारी आहे का हे तपासण्यात येईल.

जाहिरात निवडलेल्या माध्यमाचा (जसे की टीव्ही, प्रिंट, डिजिटल इ.) कसा वापर करते. ते प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे वापरले जाते का, ज्यामुळे जास्तीत जास्त रिच आणि प्रभावशाली होते का हे पाहण्यात येईल. सर्जनशीलता, थीमशी सुसंगतता, संदेशाची स्पष्टता, दृश्य प्रभाव, मौलिकता यावर निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा निर्णय अंतिम राहिल. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

A special competition to showcase the talents of the students of the state
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleInauguration of district level cultural competition : दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
Next Article Mrs. Sharvari Bhojankar : कु. शर्वरी भोजनकर यांचा राजभवन मुंबई येथे सन्मान
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

October 27, 2024

A laborer was swept away : पुराच्या पाण्यात नडव्याच्या पुलावरून मजूर वाहून गेला; झाडाचा आसरा घेत कसाबसा जीव वाचविला

September 16, 2025

विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच गेट उघडले तर डिग्रस बंधाऱ्याचे ती न गेट पाण्याचा विसर्ग विष्णूपुरीत दाखल -NNL

September 1, 2024

Journalist Health Checkup Camp : 3 डिसेंबर रोजी राज्यात “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन -NNL

November 25, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Tatyasaheb deshmukh ; हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा हा सुट्या- सुट्या पद्धतीने लढल्या गेला – तात्यासाहेब देशमुख

Chaturmasya (Chaturmas) : चातुर्मास्य (चातुर्मास)

Abdul Gafur Seth passed away : भुसार व्यापारी हाजी सय्यद अब्दुल गफुर सेठ यांच दुःखद निधन

On the occasion of bull paula festival : बैल पौळा सणाच्या निमित्ताने आकर्षक बैलजोडी मुर्ती गाय पुंजनासाठी सिडको भागात विक्रीसाठी उपलब्ध -NNL

Rabi season crop : रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?