नवीन नांदेड l सिडको व हडको येथील श्री बालाजी मंदिरात विजया दशमी दसरा निमित्ताने 2 ऑक्टोबर सकाळ पासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठया उत्साहाने गर्दी केली होती यावेळी भक्तांनी मोठया संख्येने गोविंदा गोविंदा नामाचा गजर केला, दोन्ही मंदिरात विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले होते तर मंदीर परिसरात खेळणी साहित्य, खेळाची दुकानासह अनेक दुकाने थाटली होती, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री बालाजी मंदिर हडको येथे 23 वा ब्रम्होत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात होता,गुरू सतिश महाराज यांच्या अधिपत्याखाली इंद्रमुनी दुब्बे, किरण जोशी, यांनी मंत्रोच्चाराने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा निमित्ताने होम हवन सह विविध धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर सकाळी पाच वाजल्यापासून भगवान बालाजीचे दर्शन भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले,दसरा निमित्ताने आ.प्रताप पाटील चिखलीकर, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय पाटील घोगरे,उदय देशमुख, सिध्दार्थ गायकवाड, वैजनाथ देशमुख,यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी दर्शन घेतले, यावेळी विश्वस्त समिती पदाधिकारी अरुण दमकोडंवार,प्रकाशसिंह पदाधिकारी, किशोर देशमुख,संतोष वर्मा,चंद्रशेखर चव्हाण, अजय भंडारी,सतिश मोरे दिलीप कदम यांच्या सह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


सिडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा निमित्ताने संपन्न झाल्यानंतर सकाळी होमहवन विधीपुर्वक झाल्यानंतर भाविक भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात आले. 35 वा ब्रम्होत्सव सिडको येथील बालाजी मंदिर येथे गुरू रंगनाथ चार्य,हर्ष महाराज,दिव्याशु महाराज यांच्या मंत्रोच्चार व विधीवत पूजनाने करण्यात आला, यावेळी भगवान बालाजी मंदिर येथे दैनंदिन रथ आयोजन सह दररोज वेगवेगळ्या वाहनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, कल्याण उत्सव सह रथ मिरवणूकीने विविध कार्यक्रम संपन्न झाले.


विजयादशमी दसरा निमित्ताने भगवान बालाजीचे दर्शन भाविक भक्त साठी खुले करण्यात आले. दसरा निमित्ताने विविध खेळणी साहित्य यासह लहानमु मुलांसाठी आकाश पाळणे व ईतर साहित्य असलेले दुकाने मंदिर परिसरात थाटली होती.

मंदिर समिती विश्वस्त साहेबराव जाधव,डॉ.नरेश रायेवार, तुकाराम नांदेडकर, व्यंकटराव हा डोळे, बाबुराव बिरादार, पुंडलिक बिराजदार, वैजनाथ मोरलवार व विश्वस्त समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


