Wednesday, May 13

Motorcycle thief arrested by police | मोटारसायकल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुचक्या; १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त – NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील दुचाकी चोरीच्या तपासातून यश अन्य बारा दुचाक्या चोरीचा पर्दाफाश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केला आहे. मोटार सायकल चोरट्याच्या पोलिसांनी मुचक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माधव इंरवत कवठेकर वय ३० वर्षे व्यायसाय मजुरी रा. लघुळ यांनी दिनांक १५-०७-२०२४ रोजी पोलीस स्टेशन बिलोली येथे हजर होऊन तक्रारी जबाब दिला की, दिनांक १३-०७-२०२४ रोजी नेहमी प्रमाणे रात्री २२.०० वाजता मोटारसायकल आंगणात लावुन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दिनांक १४-०७-२०२४ रोजी सकाळी ०५.०० वाजता उठून माझे घरासमोर आंगणात लावलेली मोटार सायकल क्रमांक MH २६ AE ३८०९ फैशन प्रो काळ्या रंगाची जुनी वापरती किमंती अंदाजे २५०००/- रुपयाची माझे आंगणात दिसली नाही. चोरीला गेलेली माझी गाडी कोणीतरी आज्ञात चोरटयांनी ०३.०० ते ०४.०० वाजताचे दरम्यान चोरुन नेली आहे.अशी तक्रार दिली होती. यावरून पोलीस ठाणे अंमलदार कुमार प्रसाद गायकवाड यांनी आज्ञात आरोपी विरुद्ध गुरन १५२/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय सहिंता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचा तपास चालू असतांना संशयावरुन आरोपी शुभम यशवंत कांबळे वय २० वर्षे व्यवसाय बेकार रा. हसनाळ (प.दे.) ता मुखेड ह.मु. देशमुख नगर बिलोली यास ताब्यात घेवून विचारपुस केली. यावेळी त्याने व त्यांचा साथीदार असे दोघांनी मिळून दिनांक १४-०७-२०२४ रोजी ०३.०० ते ०४.०० वाजताचे दरम्यान सदर गाडी चोरल्याचे कबुल केली. सदर गुन्हयातील चोरीस गेलेली फैशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक MH २६ AE ३८०९ किमंती २५०००/- रुपयाची त्यांचे ताब्यात मिळुन आली. यावरून दोन पंचासमक्ष दुचाकी जप्त करुन ताब्यात घेतले. त्या अटक आरोपीची कोर्टाकडुन दि. २७/०७/२०२४ पावेतो PCR घेवून त्यास विश्वासात घेवुन विचारपूस केली. यावेळी त्याने व त्याचा साथीदार असे दोघांनी मिळून बरेच मोटार सायकली चोरली आहे असे सांगितले. त्यावरून खालील प्रमाणे मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.

IMG 20240727 194408 Motorcycle thief arrested by police | मोटारसायकल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुचक्या; १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त - NNL

IMG 20240727 194357 Motorcycle thief arrested by police | मोटारसायकल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुचक्या; १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त - NNL

वरील प्रमाणे पोलीस स्टेशन बिलोली हद्दीतील ०४ व कुंडलवाडी हद्दीतील ०१ आणि इतर पोलीस स्टेशन हद्दीतील ०७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदरील चोरीच्या घटनेचा तपास श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड व बाळकृष्ण हानपुडे पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग बिलोली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले व पो.हे. कॉ.प्रभाकर गुडमलवार, पो.ना. बाबु गाजुलवार, पो.कॉ. गजानन अनमुलवार, पो.कॉ.साईनाथ होकरणे, पो.कॉ.अक्षय आचेवाड यांनी वरील १२ मोटारसायकली एकुण किमत २,६०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!