Motorcycle thief arrested by police | मोटारसायकल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुचक्या; १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त – NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील दुचाकी चोरीच्या तपासातून यश अन्य बारा दुचाक्या चोरीचा पर्दाफाश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केला आहे. मोटार सायकल चोरट्याच्या पोलिसांनी मुचक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून १२ मोटारसायकली २,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माधव इंरवत कवठेकर वय ३० वर्षे व्यायसाय मजुरी रा. लघुळ यांनी दिनांक १५-०७-२०२४ रोजी पोलीस स्टेशन बिलोली येथे हजर होऊन तक्रारी जबाब दिला की, दिनांक १३-०७-२०२४ रोजी नेहमी प्रमाणे रात्री २२.०० वाजता मोटारसायकल आंगणात लावुन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दिनांक १४-०७-२०२४ रोजी सकाळी ०५.०० वाजता उठून माझे घरासमोर आंगणात लावलेली मोटार सायकल क्रमांक MH २६ AE ३८०९ फैशन प्रो काळ्या रंगाची जुनी वापरती किमंती अंदाजे २५०००/- रुपयाची माझे आंगणात दिसली नाही. चोरीला गेलेली माझी गाडी कोणीतरी आज्ञात चोरटयांनी...

