Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

हिमायतनगर,परमेश्वर काळे| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव परिषद नियोजना संदर्भात येथील महात्मा फुले सभागृहात एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करीत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.



हिमायतनगर येथे दि. २३ मंगळवारी महात्मा फूले सभागृहात ओबीसी आरक्षण बचाव परिषद नियोजना संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत हदगावचे दताञय आनंतवार हे ओबीसी आरक्षण बचावासाठी अमरण उपोषण करीत आहेत. त्यांना हिमायतनगर तालुक्यातून पाठिंबा देवून त्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. सर्व ओबीसी प्रवर्गातील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बालाजी खरडे यांनी या प्रसंगी केले.


बैठकीच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या सभेची तयारी व अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी बचाव संवाद याञेला दोन्ही तालुक्यातून सहभागासाठी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बालाजी खरडे, नाना गुंडमवार, डाॅ. दामोधर राठोड, दिलीप राठोड, दगडू काईतवाड, कैलास राठोड, प्रताप लोकडे, व्यंकटेश लोणे, डाॅ. मनोज राऊत, बापुराव राठोड, साहेबराव चव्हाण, संदिप झळके, सदाशिव सातव, प्रताप लोकडे, बाबाराव जरगेवाड, शाम ढगे, नारायण देवकते, रामू नरवाडे, रामेश्वर पाकलवाड, कासेवाड, पाथरडकर, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.





