HomeनांदेडCM girl sister | मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबीराचे...

CM girl sister | मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबीराचे आयोजन – NNL

आ. बालाजीराव कल्याणकर यांनी हाती घेतले नोंदणी अभियान

नांदेड| राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना‘ जाहीर केली असून या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अनेक महिला लांब रांगा लावून या योजनेचा फायदा करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती व्हावी व महीलांना आपल्या भागातच घरबसल्या या योजनेची नोंदणी करता यावी म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर यांनी वार्डनिहाय नोंदणी अभियान हाती घेतले आहे त्यामुळे हजारो लाभार्थी महीलांची गैरसोय टळली आहे.

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे. एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट असून ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत १५००० रुपयांपेक्षा जास्त अनुदान घेत असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी वॉर्ड निहाय कॅम्प
मुख्यमंत्री लाडकी बहने योजनेच्या अंतर्गत जनजागृती व नोंदणी फॉर्म भरून घेण्यासाठी नांदेड उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपशहर प्रमुख मुन्ना राठौर यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम, सह संपर्क दर्शनसिंग संधू, तालुकाप्रमुख संतोष भारसावडे, मुन्ना राठौड, संतोष मादनवाड, महानगरप्रमुख राजू गुंडावार, पप्पू सोनटक्के, धम्मा कदम, उमेश दिघे, गीता पुरोहित, मनोज ठाकूर, कुवरचंद यादव या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातून शहरातील विद्युतनगर बसस्टॉप, शाहूनगर, श्रीराम नगर हनुमान गड तसेच विविध भागांमध्ये महिलांसाठी जनजागृती व नोंदणी शिबिर घेण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments