CM girl sister | मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबीराचे आयोजन – NNL
नांदेड| राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना‘ जाहीर केली असून या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अनेक महिला लांब रांगा लावून या योजनेचा फायदा करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती व्हावी व महीलांना आपल्या भागातच घरबसल्या या योजनेची नोंदणी करता यावी म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर यांनी वार्डनिहाय नोंदणी अभियान हाती घेतले आहे त्यामुळे हजारो लाभार्थी महीलांची गैरसोय टळली आहे.
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे. एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. एका कुटुंबा...
