नांदेड। पश्चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांनी पश्चिम बंगालमधील चोप्रा, उत्तर दिनाजपूर येथे एका महिलेला रस्त्यावर मारहाण करत आहेत. याविषयी कायदा व सुव्यवस्था संदर्भात संताप व्यक्त करणारे निवेदन सरस्वती प्रति्ष्ठाणच्या अध्यक्षा सौ छाया देशपांडे व कार्यकर्त्या सौ.सदिच्छा सोनी यांच्यासह शिष्टमंडळाच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
३० जून रोजी, चोप्रा भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये पश्चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान दोन लोकांना – एक महिला आणि एक पुरुष – रस्त्यावर काठीने मारहाण करताना दिसत आहे. पुरुष आणि महिलेमध्ये कथित अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ताजेमुल या प्रकरणात ‘जलद न्याय’ करत होता, ज्यासाठी तो ओळखला जातो.
व्हिडिओमध्ये ताजेमुल महिलेला अनेक वेळा मारहाण करताना दिसत आहे. ती वेदनांनी ओरडते आहे, पण तो मारणे थांबवत नाहीये. यानंतर तो महिलेजवळ बसलेल्या पुरुषाकडे वळतो आणि त्याला मारहाण करू लागतो. यादरम्यान गर्दी हा कार्यक्रम पाहत राहते. स्त्री-पुरुषाला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
व्हिडिओमध्ये एका ठिकाणी तो महिलेचे केस पकडून तिला लाथ मारतो ही सर्व घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली असून देशात कायदा व सुव्यवस्थेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि काही समाजघटकांनी तालिबानी कायदा लागू केला आहे. या विषयी संताप व्यक्त करणारे निवदेन सरस्वती प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्या सौ.सदिच्छा वैजनाथ सोनी यांच्यासह अध्यक्ष सौ.छाया देशपांडे आणि महीला मंडळीनी दिले आहे. यात दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंतीवजा मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.