पश्चिम बंगाल येथे महीलांवर अत्याचारावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -NNL
नांदेड। पश्चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांनी पश्चिम बंगालमधील चोप्रा, उत्तर दिनाजपूर येथे एका महिलेला रस्त्यावर मारहाण करत आहेत. याविषयी कायदा व सुव्यवस्था संदर्भात संताप व्यक्त करणारे निवेदन सरस्वती प्रति्ष्ठाणच्या अध्यक्षा सौ छाया देशपांडे व कार्यकर्त्या सौ.सदिच्छा सोनी यांच्यासह शिष्टमंडळाच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
३० जून रोजी, चोप्रा भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये पश्चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान दोन लोकांना - एक महिला आणि एक पुरुष - रस्त्यावर काठीने मारहाण करताना दिसत आहे. पुरुष आणि महिलेमध्ये कथित अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ताजेमुल या प्रकरणात 'जलद न्याय' करत होता, ज्यासाठी तो ओळखला जातो.
व्हिडिओमध्ये ताजेमुल महिलेला अनेक वेळा मारहाण करताना दिसत आहे. त...
