हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव भोकर हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथील श्री दत्त संस्थानमध्ये एकादश लक्ष पार्थिव शिवलिंगार्चना पूजन यज्ञाचे आयोजन पवित्र श्रावण मासानिमित्त करण्यात आले आहे. या धार्मिक उपक्रमात परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान श्री महादेवांचे कृपाशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे.


श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या पार्थिव शिवलिंग पूजनामध्ये दररोज सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत भाविकांना सहभागी होता येणार आहे. १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक उपक्रम सुरू राहणार आहे.


पार्थिव शिवलिंगाची पूजा ही भगवान महादेवाच्या भक्तीतील अत्यंत पवित्र साधना मानली जाते. श्रावण महिन्यात या पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांसाठी ही सेवा व पूजेची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व भाविकांनी कुटुंबासह या पवित्र पूजनात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पूजेला बसण्यासाठी पूर्वनोंदणी व संपर्कासाठी : ९८३४२११२१७, ९८९००३६२९१ हर हर महादेव! ॐ नमः शिवाय!




