HomeकरियरIdeal Tahsildar Award : महसूल दिनी 'आदर्श तहसीलदार' पुरस्काराने पल्लवी टेमकर यांचा...

Ideal Tahsildar Award : महसूल दिनी ‘आदर्श तहसीलदार’ पुरस्काराने पल्लवी टेमकर यांचा गौरव

पारदर्शक, गतिमान प्रशासनाची जिल्हास्तरावर दखल; पंचायत समितीकडून उत्स्फूर्त सत्कार

हिमायतनगर, प्रतिनिधी| महसूल विभागात पारदर्शक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासनाची प्रभावी छाप उमटवणाऱ्या हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांना महसूल दिनानिमित्त ‘आदर्श तहसीलदार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते झालेल्या या गौरवामुळे हिमायतनगर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी महसूल प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांना वेळेत सेवा, निवडणूक व्यवस्थापन, मतदार यादीचे काम, आपत्ती व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांना ‘आदर्श तहसीलदार’ पुरस्काराने गौरविले.

या सन्मानानंतर पंचायत समिती, हिमायतनगर येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मंडळ अधिकारी एम. बी. चव्हाण, अभियंता विशाल पवार, ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे, ग्रामसेवक सटलावार, ग्रामसेवक भोगे, नरेगा विभागाचे अभियंता भिसे, कोंडलवार, बांधकाम विभागाचे कदम, जामकर, पांचाळ, अद्वैत देशपांडे, देवसरकर, सरपंच मारोती वाडेकर, पत्रकार सोपान बोंपीलवार, दत्ता पुपलवाड यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FB IMG 1786106367494 Ideal Tahsildar Award : महसूल दिनी 'आदर्श तहसीलदार' पुरस्काराने पल्लवी टेमकर यांचा गौरव

उपस्थित मान्यवरांनी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या कर्तव्यदक्ष, पारदर्शक आणि जनहिताच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक प्रभावीपणे जनतेची सेवा करेल, असा विश्वास व्यक्त केला. ‘आदर्श तहसीलदार’ हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण हिमायतनगर तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments