HomeनागपूरChief Minister Devendra Fadnavis : पैसे नाहीत म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही :...

Chief Minister Devendra Fadnavis : पैसे नाहीत म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाआरोग्य शिबिरात ३१ हजार रुग्णांची तपासणी; साडेचार हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार

नागपूर| गंभीर आजार कितीही मोठा असला तरी केवळ पैसे नाहीत म्हणून गरीब रुग्णांचे उपचार थांबू नयेत, यासाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देत आहे. ‘महाआरोग्य शिबिर’ हे गरीब रुग्णांसाठी वरदान ठरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हा या शिबिराचा उद्देश आहे. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून ५७ हजार रुग्णांना उपचारासाठी ४५२ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गंभीर आजारांचा समावेश वाढविण्यात आला असून, काही आजारांसाठी ९ लाखांपर्यंत, तर काही गंभीर आजारांसाठी ३५ लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

maha 1 Chief Minister Devendra Fadnavis : पैसे नाहीत म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऐकू न आल्यामुळे बोलता न येणाऱ्या बालकांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया मोफत सुरू करण्यात आल्या आहेत. दिव्यांग बांधवांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी कृत्रिम हात-पायांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांची सेवा होत असल्याचे सांगितले. कर्करोगावरील काही औषधे, कॅप्सूल आणि इंजेक्शनचा खर्च मोठा असल्याने तो कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या शिबिराच्या निमित्ताने १५ ते २२ जुलैदरम्यान शहरातील विविध ठिकाणी ३१ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे साडेचार हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार संदीप जोशी यांनी दिली.

शिबिरात हृदयरोग, त्वचारोग, कर्करोग, नेत्र, ईएनटी आणि अन्य आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. रुग्णांना औषधे, विविध चाचण्या, शस्त्रक्रिया आणि इतर उपचारांची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिरता दवाखाना, रुग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच दिव्यांगांना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments