Homeक्राईमLCB's crackdown : एलसीबीची धडक कारवाई : अवैध वाळू उपशावर मोठा घाव;...

LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : अवैध वाळू उपशावर मोठा घाव; ४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ४९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २३ मार्च रोजी एलसीबीच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान १ ब्रास अवैध वाळू (₹५०,०००) तसेच हायवा (₹४९ लाख) असा एकूण ₹४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाजेगाव,नांदेड आणि रा. बोंडार, उमरी येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments