बँक लिंकिंगच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद; आरोपीकडून २० हजार रुपये जप्त

IMG 20260308 WA0022 बँक लिंकिंगच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद; आरोपीकडून २० हजार रुपये जप्त

नांदेड | बँक खाते लिंकिंग करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध नांदेड पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून २० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध भागात बँक खाते लिंकिंग किंवा इतर कारण सांगून नागरिकांना फसवून पैसे उकळण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रवि देविदास धुमाळ (वय १९, रा. गौतमनगर, सांगवी, नांदेड) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणूक केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून २० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली असून त्याच्याविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१८/२०२५ कलम ३०४(१), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व अपर पोलीस अधीक्षक गुरज गुरज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top