HomeनांदेडVamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक...

Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

नांदेड l हिमायतनगर तालुक्यातील प्रख्यात कवी, शाहिर व समाजप्रबोधनकार सुभाष पांडुरंग गुंडेकर (सरसमकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अंतर्गत महाकवी वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हे बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

शाहिर सुभाष गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी गायनकलेच्या माध्यमातून दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, दलित समाजजागृती तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सातत्याने पुढे नेत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. येथील ज्येष्ठ गायक व समाजप्रबोधक म्हणून सुभाष गुंडेकर यांच्या दीर्घकालीन व सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन, नामवंत दलित साहित्यिक महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा कला सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या संमेलनात देशभरातील साहित्यिक, कवी, विचारवंत, कलाकार व समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विविध साहित्यिक सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे संमेलन विशेष लक्षवेधी ठरणार आहे. शाहिर सुभाष गुंडेकर यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments