Thursday, May 14

Tag: Shahir Subhash Gundekar announced Vamandada Kardak Kala Samman Award

Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
नांदेड l हिमायतनगर तालुक्यातील प्रख्यात कवी, शाहिर व समाजप्रबोधनकार सुभाष पांडुरंग गुंडेकर (सरसमकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अंतर्गत महाकवी वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हे बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. शाहिर सुभाष गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी गायनकलेच्या माध्यमातून दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, दलित समाजजागृती तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सातत्याने पुढे नेत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. या ...
error: Content is protected !!