Homeक्राईमHimayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन...

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर अखेर महसूल प्रशासनाने कंबर कसत थेट धडक कारवाई सुरू केली आहे. केवळ पाच दिवसांत एक हायवा, दोन ट्रॅक्टर अशी तीन अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त करून महसूल पथकाने रेती माफियांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या कार्यवाहीने हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असल्याने गौण खनिज माफियात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी बी.एम. चव्हाण यांनी वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, हिमायतनगर तहसीलच्या तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या स्पष्ट आदेश व मार्गदर्शनाखाली पळसपूर शिवारासह तालुक्यातील विविध ठिकाणी मध्यरात्री सापळे रचून कारवाया केल्या आहेत. दिनांक ४, ५ व ७ फेब्रुवारीच्या रात्री पळसपूर परिसरात अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तात्काळ जप्त करण्यात आले आहे.

IMG 20260208 WA0010 scaled Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

मागील अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या रेती चोरी व मुरूम उत्खननमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत होते. याबाबत जिल्हा स्तरावरील आदेशाची अंमल बजावणी करत हिमायतनगर महसूल पथकाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे प्रशासनाची “झिरो टॉलरन्स” भूमिका स्पष्ट झाली असून, पुढील काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

IMG 20260208 WA0012 Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

या धडाकेबाज कारवाईचे शहरासह तालुक्यातील नागरिक, शेतकरी व पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. दरम्यान, जप्त वाहनांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया हिमायतनगर तहसील कार्यालयात सुरू असून, अवैध रेती माफियांविरोधात कारवाईची मालिका थांबणार नसल्याची माहिती मंडळ अधिकारी श्री बी.एम.चव्हाण यांनी दिली आहे. या कार्यवाहीसाठी वाहन चालक आकाश बारकूल, महसूल सेवक योगेश आलेवाड, भीमराव जाधव, ग्राम महसूल अधिकारी गजानन आडे, अभिजित राणे यांचे सहकार्य लाभले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments