Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर अखेर महसूल प्रशासनाने कंबर कसत थेट धडक कारवाई सुरू केली आहे. केवळ पाच दिवसांत एक हायवा, दोन ट्रॅक्टर अशी तीन अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त करून महसूल पथकाने रेती माफियांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या कार्यवाहीने हिमायतनगर महसूल प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असल्याने गौण खनिज माफियात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी बी.एम. चव्हाण यांनी वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, हिमायतनगर तहसीलच्या तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या स्पष्ट आदेश व मार्गदर्शनाखाली पळसपूर शिवारासह तालुक्यातील विविध ठिकाणी मध्यरात्री सापळे रचून कारवाया केल्या आहेत. दिनांक ४, ५ व ७ फेब्रुवारीच्या रात्री पळसपूर परिसरात अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तात्काळ जप्त करण्यात आले आहे.
माग...
