Homeक्राईमBroke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या

Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या

नांदेड | नांदेड शहरात एटीएम फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राम मोहन कुचे (वय २६), रा. गागलगाव ता. निलंगा, जि. लातूर (सध्या रा. हडको परिसर, श्रीनगर, नांदेड) असे आहे. आरोपीकडून ATM फोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील विविध भागात ATM फोडण्याचे प्रकार घडल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवत रात्री २.१५ वाजता सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. तपासा दरम्यान आरोपीने नांदेड शहरातील विविध ATM केंद्रांवर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीस ठाणे सायननगर व वजिराबाद येथे गुन्हा र.नं. 68/2026 अन्वये BNS कलम 324(4), 331(4), 305, 62 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षकश्रीमती प्रिया पाटील व अपर पोलीस अधीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्यासह अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या टोळ्यांवर कडक नजर ठेवण्यात येत असून, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments