Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
नांदेड | नांदेड शहरात एटीएम फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राम मोहन कुचे (वय २६), रा. गागलगाव ता. निलंगा, जि. लातूर (सध्या रा. हडको परिसर, श्रीनगर, नांदेड) असे आहे. आरोपीकडून ATM फोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील विविध भागात ATM फोडण्याचे प्रकार घडल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवत रात्री २.१५ वाजता सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. तपासा दरम्यान आरोपीने नांदेड शहरातील विविध ATM केंद्रांवर ...
