नांदेड (प्रतिनिधी) महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दी, स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदान शताब्दी तसेच आर्य समाज स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामेश्वरम (तामिळनाडू) ते श्रीनगर (जम्मू-काश्मीर) अशी भव्य सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रा संपूर्ण देशभरातून प्रवास करत असून ही रथयात्रा दि. २८ जानेवारी २०२६ रोजी नांदेडच्या पावन नगरीत दाखल होत आहे.

या महारथयात्रेमध्ये दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत अखंड वेद यज्ञ सुरू असून, राष्ट्रकल्याण, धर्मजागृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात येत आहे. शहरातील सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, सनातन जागरणचे पदाधिकारी तसेच हिंदू बांधवांनी या महायज्ञामध्ये तन–मन–धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही रथयात्रा सायंकाळी ४ वाजता चंदा सिंग कॉर्नर, नांदेड येथे दाखल होणार असून, तेथून मिरवणूक पुढील मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. चंदासिंग कॉर्नर – ढवळे कॉर्नर – दूध डेरी – वसरणी – मोंढा नाका – जुना मोंढा – आर्य समाज मंदिर – टॉवर चौक – गुरुद्वारा चौक – महावीर चौक – वजीराबाद चौक – कला मंदिर – शिवाजीनगर – फुले मार्केट – आयटीआय चौक – साठे चौक – महाराणा प्रताप चौक – हनुमान गड कमान मार्गे वाईट हाऊस येथे श्री कंठेवाडजी यांच्या निवासस्थानी ही यात्रा पोहोचणार आहे. याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजता सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



नांदेड शहरातील नागरिकांनी रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी उपस्थित राहून उत्स्फूर्त स्वागत करावे व या ऐतिहासिक धार्मिक यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


