Sanatan jagran : सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रेचे २८ जानेवारीला नांदेडमध्ये भव्य आगमन
नांदेड (प्रतिनिधी) महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दी, स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदान शताब्दी तसेच आर्य समाज स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामेश्वरम (तामिळनाडू) ते श्रीनगर (जम्मू-काश्मीर) अशी भव्य सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रा संपूर्ण देशभरातून प्रवास करत असून ही रथयात्रा दि. २८ जानेवारी २०२६ रोजी नांदेडच्या पावन नगरीत दाखल होत आहे.
या महारथयात्रेमध्ये दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत अखंड वेद यज्ञ सुरू असून, राष्ट्रकल्याण, धर्मजागृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात येत आहे. शहरातील सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, सनातन जागरणचे पदाधिकारी तसेच हिंदू बांधवांनी या महायज्ञामध्ये तन–मन–धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही रथयात्रा सायंकाळी ४ वाजता चंदा सिंग कॉर्नर, नांदेड येथे दाखल होणार असून, तेथून मिरवण...
