उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे जोशीसांगवी ता. लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वानुमते नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक असलेले रामदास सयाजीराव तांबोळी यांची तर व्हा.चेअरमन म्हणून नामदेव बालाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वाजतगाजत गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर मा.जि.प. सदस्या यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.


दि. १३ नोव्हेंबर २०२५ गुरुवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी सहायता लोहा कार्यालयाचे अधिकारी डी. एस. कांबळे श्रेणी २ प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तेलंगवाडी येथील संस्थेच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात मागील सभेचे विषय वाचवून पुढील सभेला सुरूवात झाली. विद्यमान चेअरमन संजय पाटील मोरे यांनी आपल्या चेअरमन व रामदास तांबोळी यांनी व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा देऊन नवीन चेअरमन निवडण्यासाठी परवानगी दिली. याप्रसंगी उपस्थित सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक सभासदांच्या परवानगीने ज्येष्ठ संचालक रामदास सयाजीराव तांबोळी यांची चेअरमन म्हणून तर व्हा.चेअरमन म्हणून नामदेव बालाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


एका छोट्या खानी आयोजित सत्कार समारंभ सोहळ्यास वडेपुरी सर्कलच्या मा. जि.प.सदस्या. सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर , आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर ,शंकरराव पाटील ढगे किवळेकर, माजी चेअरमन संजय पाटील मोरे, शिवराज तांबोळी, माणिक उर्फ पप्पू काळम, वैजनाथ पाटील घोरबांड, टाकळगावचे सरपंच भिमराव लामदाडे,बद्रीनाथ,वडगावचे चेअरमन माधव भोर,आनंदराव लोंढे,बंडूप पाटील, उत्तमराव दासरे , विनायकराव एकबोटे ,अनुसयाबाई लोंढे ,भगवानराव गजभारे ,सुनिल लोंढे ,गोविंदराव पाटील मोरे,बालाजीराव पाटील मोरे,शहाजी पाटील, काळबापाटील काळे ,शामराव वर्ताळे ,शशिकांत सर,सुनिल राजदंड,मारोती पाटील घोरबांड, आदीची उपस्थिती होती . जोशीसांगवी , तेलंगवाडी च्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास पाटील तांबोळी यांची तर व्हाइस चेअरमन म्हणून नामदेव पाटील मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व संचालक सभासदांचा उपस्थित राहून त्यांचा सत्कार सन्मान केला.

यावेळी नवनिर्वाचित बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकारी यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या माध्यमातून ते शेतकरी सभासद , कामगार व ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी पारदर्शक कारभार करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी
सभासद ,सचिव कवडे व्हि.ए.,सहकार अधिकारी एस.डी.कांबळे यांच्यासह लोंढेसांगवी, जोशीसांगवी, उस्माननगर शिराढोण तांडा,किवळा,वडगाव व तेलंगवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे तांबोळी परिवारा तर्फे शिवराज तांबोळी यांनी पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश मामा बास्टे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवराज तांबोळी यांनी केले.


