हदगांव,गौतम वाठोरे| हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी राजकीय हेतूने काम केल्याप्रकरणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तात्काळ जिल्हा बाहेर अकार्यकारी पदावर बदली करण्यात बाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी १ जुलै २०२५ रोजी सरपंच पदाचे आरक्षण करताना त्यात एस सी एस टी व महिला तसेच खुल्या प्रवर्गाचे आरक्षण करताना जाणीवपूर्वक चुकीचे आरक्षण काढण्यात आल्याच्या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी नांदेड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यात त्या अनुषंगाने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. सदरहून चौकशी समितीने ८ ऑक्टोंबर रोजी सादर केलेल्या अहवालात मुंबई ग्रामपंचायत (सरपंच उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील कलम ५ तरतुदीनुसार विसंगत आहे.


असे करताना त्यांनी नियमानुसार कारवाई केली नसल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०२५ साठी सुरेखा नांदे यांना तहसीलदार तसेच निवडणुकीची कोणतीही संविधानिक जबाबदारी त्यांनी योग्य नसल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येत असल्याने त्यांना तहसीलदार हदगाव या पदावर ठेवणे योग्य नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नांदेड यांनी तहसीलदार हदगाव या पदावर कार्य ठेवणे योग्य नसल्याचे कळवल्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ जिल्ह्याबाहेर व अकार्यकारी पदावर बदली करण्याची मागणी केली आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे गांभीर्य विचारात घेता श्रीमती नांदे यांना तहसीलदार हदगाव या पदावर तात्काळ कार्यमुक्त करण्यात चे तसेच पदस्थापनेवर शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत त्यांना विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे दैनंदिन उपस्थिती नोंदवण्याचे आदेश मनीषा जायभाये सहसचिव महाराष्ट्र शासन काढण्यात आले आहे.



