उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर बुद्रुक ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिमवंत वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात दि. १८ ऑक्टोबर २०२५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य कार्यक्रम दि. २४ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायं. सात वाजता अग्नी पुजा करुन अग्नी प्रज्वलित करण्यात येईल. व रात्रभर संगीत भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दुसऱ्या दिवशी दिनांक २५ ऑक्टोबर शनिवारी सकाळी पाच वाजता पालखीचे अग्नीतुन प्रवेश व पालखीचे गावातील प्रमुख रस्त्याने वाजंत्रीच्या आणि टाळ मृदुंगाच्या संगीत भजनाच्या निनादात मिरवणूक निघेल. व वेळ अकरा ते १ काल्याचे किर्तन आणि नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.


श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ५ काकडा भजन , ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण , ९ ते ११ गाथा भजन , दु. १२ ते ४ महीला भजन , साय. ४ ते ५ ज्ञानेश्वरीवर प्रवचन , ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ हरि किर्तन व हरिजागर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहातील नामवंत विचारवंत किर्तनकार व प्रवचनकार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये दि. १८ ऑक्टोबर शनिवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. शिवराज महाराज कलंबर तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. ज्ञानोबा माऊली गुंडेवाडीकर , दि. १९ ऑक्टोबर रोजी रविवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. माधव पा. घोरबांड लाठ खु. तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. भगवान महाराज लहानकर वसमत , दि. २० ऑक्टोबर रोजी सोमवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. गुरू गैबी नागेंद्र महाराज भारती पानभोसीकर तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. प्रमोद महाराज चौडीकर , दि. २१ ऑक्टोबर रोजी मंगळवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. दत्तराम पाटील सोरगे कलंबरकर, तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. नामदेव महाराज दापकेकर , दि. २२ ऑक्टोबर रोजी बुधवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. मारोतराव बालाजी कदम आंबे सांगवीकर तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर , दि. २३ रोजी गुरूवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. दत्तात्रय महाराज ताटे पोखरभोसीकर , तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. भगवान महाराज शेंद्रेकर , दि. २४ रोजी शुक्रवारी प्रवचनकार म्हणून ह. भ. प. गोपाल भरतसिंह भगिले कलंबरकर , तर किर्तनकार म्हणून ह. भ. प. बाबु महाराज काकांडीकर , आणि दि. २५ ऑक्टोबर शनिवारी सकाळी ११ वा . काल्याचे किर्तनकार म्हणून ह. भ. प. राजेश पाटील बिदरकर यांच्या काल्यावरील किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होणर आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व समस्त गांवकरी मंडळी , कलंबर बु. , भोपाळवाडी , आबादी , मोकलेवाडी आणि ग्रामपंचायत यांनी केले आहे.


२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
श्री संत अगडंमबुवा यात्रेचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान समजून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि. २४ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी १० वा. जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर बु. ता. लोहा येथे आयोजित करण्यात आले आहे . यावेळी श्री. गुरू गोविंदसिंगजी ब्लड बँक नांदेड सहकार्य करणार आहे तरी परिसरातील गरजू नागरिकांनी रक्तदान शिबीरासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त विविध स्टाॅल , खेळणे दुकानाची गर्दी
श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त कलंबर बुद्रुक येथे विविध प्रकारचे स्टॉल्स, खेळणे , दुकानांनी गर्दी केली आहे. बच्चे कंपनी झुल्यावर बसुन आनंद घेत आहेत. यात्रेनिमित्त कलंबर नगरी भक्तीमय वातावरणात बदलून गेली आहे.



