Agdambbuwa : श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर बुद्रुक ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिमवंत वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात दि. १८ ऑक्टोबर २०२५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य कार्यक्रम दि. २४ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायं. सात वाजता अग्नी पुजा करुन अग्नी प्रज्वलित करण्यात येईल. व रात्रभर संगीत भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दुसऱ्या दिवशी दिनांक २५ ऑक्टोबर शनिवारी सकाळी पाच वाजता पालखीचे अग्नीतुन प्रवेश व पालखीचे गावातील प्रमुख रस्त्याने वाजंत्रीच्या आणि टाळ मृदुंगाच्या संगीत भजनाच्या निनादात मिरवणूक नि...
