Homeक्राईमNanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

Nanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

नांदेड| शहरात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा खून करून परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींची नांदेड ग्रामीण पोलिसांनी धिंड काढली आहे. ही घटना नांदेडमधील खुदवे नगर भागात घडली असून, जिथे आरोपी मोहम्मद आमीर मोहम्मद गौस आणि मोईन खान पाशा खान यांनी खून करून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेत प्रमुख संशयित आरोपीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींची त्याच खुदवे नगर भागातून धिंड काढत समाजात एक संदेश दिला कि, ‘गुन्हेगारी सहन केली जाणार नाही. आणि परिसरात जनतेत निर्माण झालेली भीती दूर करून कायद्याचा धाक निर्माण केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असून, शहर परिसरात दहशत माजवणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

police q Nanded Rural Police : खुनातील आरोपीची नांदेड ग्रामीण पोलिसांकडून धिंड फिरवणूक

“गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक समाजात भीती पसरवतात. अशा आरोपींवर कायदेशीर कारवाई तर होणारच आहे, पण समाजात संदेश देण्यासाठी अशा उपायांची गरज आहे अशी प्रतिक्रिया नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकान्त चिंचोलकर यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments