नवीन नांदेड l हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात ब्रम्होत्सव निमित्ताने कल्याण उत्सवा मध्ये 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंगलाष्टके, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित भाविक भक्तांसाठी विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री बालाजी मंदिर हडको येथे 23 वा ब्रम्होत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात होता 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता यजमान आरती अमिक दमकोडंवार , सौ.विजया किशनराव रामप्रल्ली, सौ.विजया विवेकानंद देशमुख, आश्वर्या आशिष वटमवार,यांच्या उपस्थितीत व गुरू सतिश यांच्या अधिपत्याखाली इंद्रमुनी दुब्बे, किरण जोशी, यांनी मंत्रोच्चाराने व पाच मंगलाष्टके गाऊन फटाक्यांची आतिषबाजी,ढोल ताशांच्या गजरात हा विवाह सोहळा संपन्न झाला.


यावेळी विश्वस्त समिती पदाधिकारी अरुण दमकोडंवार,प्रकाशसिंह पदाधिकारी, किशोर देशमुख,संतोष वर्मा, चंद्रशेखर चव्हाण, अजय भंडारी,सतिश मोरे यांच्या सह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले, विवाह सोहळा नंतर उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. सुत्रसंचलन दिलीप कदम यांनी केले.


सिडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे सायंकाळी 8 वाजता कल्याण उत्सवा अंतर्गत बालाजी लक्ष्मी पद्मवती सोहळा यजमान साहेबराव जाधव, डॉ.नरेश रायेवार,घडीसाज महाराज, गणेश शिंदे,महादेवी वैजनाथ पाटील,प्रतिभा होटुळकर यांच्या उपस्थितीत गुरू रंगनाथ चार्य, हर्ष महाराज,दिव्याशु महाराज यांच्या मंत्रोच्चार व विधीवत पूजन करून शुभविवाह साठी मंगलाष्टके, गायल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी मध्ये साजरा करून प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी मंदिर समिती विश्वस्त साहेबराव जाधव, डॉ.नरेश रायेवार, तुकाराम नांदेडकर, व्यंकटराव हा डोळे, बाबुराव बिरादार, पुंडलिक बिराजदार, वैजनाथ मोरलवार व विश्वस्त समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा निमित्ताने मंदिरात होमहवन सह दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.


