देगलूर l यावर्षी कधी नव्हे एवढी सतत 4 वेळा झाले ल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शेजारील आन्ध्रा प्रदेश व पंजाब सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान दिल्या प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे निवडणुकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे पीक कर्ज माफ करावे, पीकविमा मंजूर करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी केली आहे , अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की यावेळी शेतकरी बांधवांनी निसर्गाच्या व नशिबाच्या भरवशावर उसनवारी व्याजीबट्टी करुन खरीप हंगामातील महागामोलाची सोयाबीन कापूस उडीद मूग बियाणे, खते ,कीटकनाशके खरेदी करून पेरणी केली होती पण शेतकऱ्यांच्या” नशिबी सटवीने पाचविला पुजलेल्या अलिखित दुष्काळ ” लिहून ठेवल्या प्रमाणे या वर्षी तर दर वर्षी पेक्षा अस्मानी संकटामुळे माणसे मेली , जनावरे मेली शेतातील माती वाहून गेली ,” न भुतो न भविष्यते” सततच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून केलेली मशागत, पेरणी, पिके, शेतातील माती वाहुन गेली आहेत गेल्या 5 वर्षा पासुन सतत ओला दुष्काळ पडला असल्याने शेतकरी राजा , अन्नदाता, जगाचा पोशिंदा कर्ज बाजारी आर्थिक दृष्ट्या डबघाईस आला आहे.

त्या कंबरडे मोडले आहे त्यामुळे शेकडो शेतकरी संसाराला वाऱ्यावर सोडून आत्महत्या सारखा अघोरी प्रकार वाढीस लागल्याने शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत .गत वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हेक्टरी 1350 रुपये अनुदान 3 हेक्टर पर्यंत दिले गेले पिक विमा सुद्धा नाममात्र 1 रुपयांत दिला गेला त्यामुळे थोडीफार मदत मिळाली होती यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुका नसल्याने शासन शेतकऱ्यांसोबत” गरज सरो वैध मरो ” भाड में जाये जनता अपना काम बनता ” मतलबी या दुष्ट भावनेतून वागत आहे.


गत वर्षी पेक्षा यावर्षीचे नुकसान कित्येक पट्टीने जास्त आहे व मदतमात्र फक्त तुटपुंजी क्रूर थट्टा करीत 8500 पेक्षाही कमी अनुदान तेही 3 हेक्टर ऐवजी फक्त 2 हेक्टर पर्यंत अतिशय” उद जळना पीर उठना” असा प्रकार तुटपुंजी मदत आहे, व 1 रुपयांत पीकविमा योजना सुद्धा बंद करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड प्रमाणात नाराजी आहे इतर राज्य शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान देऊ शकतात तर महाराष्ट्र शासनाचे महसुली उत्पन्न जास्त असताना तुटपुंजी मदत कमी प्रमाणात देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे.

जर हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात आले नाही तर शेतकरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगर पालिका निवडणुकीत सत्तारुढ महायुतीचा पराभवाची धुळ निश्चितच चारेल त्या मुळे वेळीच सुधरा असा सल्लाही देऊन हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान , उद्योग पतीचे दरवर्षी हजारो कोटी कर्ज विनाकारण माफ होऊ शकते तर राबराब राबणाऱ्या आर्थिक दृष्ट्या डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी का होत नाही असा सवालही करुन पंतप्रधान मोदी यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे व मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ने कर्ज माफीचे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्ज माफी करावी, पीकविमा मंजूर करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला दिला आहे या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

