Mahesh Patil ; पंजाब /आंध्र प्रदेश प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान देण्यात यावे महेश पाटील
देगलूर l यावर्षी कधी नव्हे एवढी सतत 4 वेळा झाले ल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शेजारील आन्ध्रा प्रदेश व पंजाब सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान दिल्या प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे निवडणुकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे पीक कर्ज माफ करावे, पीकविमा मंजूर करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी केली आहे , अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर...
