नवीन नांदेड l जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या वतीने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील 2314 मालमत्ता धारका कडील थकबाकी असणाऱ्या 50 हजारावरील थकबाकी मालमत्ता 13 सप्टेंबर रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मुख्यालयात होणाऱ्या लोक अदालतीसाठी थकीत मालमत्ता धारकांना वसुली लिपीक यांच्या मार्फत नोटीसा देण्यात आल्या असून थकीत मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ . मिर्झा बेग यांनी केले आहे.


नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मध्ये एकुण मालमत्ता धारक जवळपास 28 हजार असुन मालमत्ता करापोटी थकीत मालमत्ता कर व चालू वर्षीच्या मालमत्ता करापोटी थकबीकादार मालमत्ता धारकांना मनपा प्रशासन यांच्या वतीने नावा मनपाच्या मुख्यालय 13 सप्टेंबर रोजी थकीत मालमत्ता करा संदर्भात संबंधित थकबाकीदार असलेल्या मालमत्ता कर धारकासाठी लोक अदालत ठेवण्यात आली असून यात मालमत्ता धारकांना थकीत बाकी रक्कम भरण्यासाठी आपले म्हणणे मांडुन कर भरता येणार आहे, विशेष म्हणजे 13 सप्टेंबर साठी मालमत्ता थकीत बाकी वर 80 टक्के सुट दिली आहे.


मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर उपायुक्त अजितपाल संधु ,गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय वाघाळा सहाय्यक आयुक्त डॉ, मिर्झा बेग कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी कार्यालय अंतर्गत 2314 मालमत्ता धारकांना कर निरीक्षक संजय नागापूरकर, मारोती सारंग, शेख शादुला ,वसंत कल्याणकर व वसुली लिपीक मालु एनफळे , विवेकानंद लोखंडे,ऊतम जोंधळे, नथुराम चवरे, रविंद्र पवळे, सुधीर कांबळे, राहुल पाईकराव, रमेश यशवंतकर,दिपक जोंधळे,यांनी वाटप केले आहे.




