CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 2314 थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा
नवीन नांदेड l जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या वतीने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील 2314 मालमत्ता धारका कडील थकबाकी असणाऱ्या 50 हजारावरील थकबाकी मालमत्ता 13 सप्टेंबर रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मुख्यालयात होणाऱ्या लोक अदालतीसाठी थकीत मालमत्ता धारकांना वसुली लिपीक यांच्या मार्फत नोटीसा देण्यात आल्या असून थकीत मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ . मिर्झा बेग यांनी केले आहे.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मध्ये एकुण मालमत्ता धारक जवळपास 28 हजार असुन मालमत्ता करापोटी थकीत मालमत्ता कर व चालू वर्षीच्या मालमत्ता करापोटी थकबीकादार मालमत्ता धारकांना मनपा प्रशासन यांच्या वतीने नावा मनपाच्या मुख्यालय 13 सप्टेंबर रोजी थकीत मालमत्ता क...
