नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण पोलीसांनी बचत गटाच्या पैश्याची मोटार सायकला लटकविलेली बॅग घेवून पळून जाणाऱ्या दोघांना ताव्यात घेवून एकुण 1,60,510/- रु चा मुद्देमाल केला जप्त केला असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.


फिर्यादी सुर्यकांत काशीनाथ बॉडलवाड रा. पाटणपुर ता. अर्धापुर जि नांदेड यांनी दिनांक 26 ऑगस्ट 25 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रार दिली की, दि. 25.08.2025 रोजी गाडेगाव रोडवरील अस्ताना ए हबीब मंजिस्द जवळ एकबालनगर नांदेड येथे रोडच्या कडेला लोन रिकवरीचा जमा झालेली नगदी रक्कम 91,332/- रु ची मोटार सायकला लटकवलेली बँग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.

वगैरे फिर्याद वरुन वर नमुद दाखल गुन्ह्यात ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या सोबतचे अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे गाडेगाव रोडवर जावून वर नमुद एक आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याची उकल करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलामाल नगदी 30,510/-रुपये व एक चोरीची पल्सर मोटार सायकल किमती 1,30,000/- रुपयाची असा एकुण 1.60,510/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.गुन्हा उघडकीस आनणारे पोलीस अधिकारी व अंमलदार
पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, पोहेको वसंत केंद्रे, पोकोंसंतोष पवार, पोकोंविष्णु कल्याणकर, पोको पचलिग नेमणूक पो.स्टे.
नांदेड ग्रामीण यांच्ये अभिनंदन केले आहे.



